रेल्वेच्या धडकेने अज्ञात तरुणाचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठीता प्र 22 :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कन्हान कामठी रेल्वे मार्गावरील कन्हान नदी रेल्वे पुलावर अज्ञात रेल्वेगाडीने अज्ञात 25 वर्षीय तरुणाला धडक दिल्याने तरुण रेल्वे रुळावरुन कन्हान नदीपात्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना 21 जून रोज मंगळवार ला दुपारी अडीच वाजता सुमारास उघडकीस आली आहे नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी रेल्वे स्टेशन मधील कर्मचारी कृष्णा नारायण पांडे वय 56 यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार कामठी कन्हान रेल्वेमार्गावरील रेल्वे पुलावर अज्ञात रेल्वेगाडीने धडक दिल्याने 25 वर्ष अज्ञात तरुण नदीपात्रात पडून मृत्यू झाल्याची घटना झाली असल्याची तक्रार नवीन कामठी पोलीस स्टेशनला केली असता नवीन कामठी पोलीस ठाण्यातचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस पिल्ले व सहकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहेत मृतक 25 वर्षीय तरुण असून वर्ण सावळा असून अंगात काळ्या रंगाचा पॅन्ट व निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे सांगण्यात आले आहे मृत्तका विषयी ज्यांना माहिती असल्यास त्यांनी त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!