नागपूर :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगना व उत्तर भारतातील राज्ये यांच्या तर्फे दिनांक २६-२७ जुलै २०२३ रोजी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी केंद्रातील भाजपा सरकारच्या भारतीय राज्य घटना लोकशाही विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व भाजपच्या धर्म, जाती धुवीकरनावरील आधारीत ‘नफरत की राजनीती’ याचा तीव्र धिक्कार करण्याससाठी पक्षाच्या राज्य शाखेच्या वतीने जाहीर धरना आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बीआरएसपी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अड. डॉ.सुरेश माने यांनी नागपूरात पक्षाच्या विदर्भातील प्रमुख कार्यकत्यांच्या दोन दिवसीय विचार मंथन बैठकीत पक्षाचे आगामी कार्यक्रम व तैयारी’ याचा आढावा घेतांना जाहीर केले ही दोन दिवसीय विचार मंथन बैठक २७-२८ मे २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कार्मेलनी, नागपूर येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बीआरएसपीच्या या दोन दिवसीय विचार मंथन बैठकीत अँड.डॉ.सुरेश माने यांनी पक्षाच्या गेल्या ७ वर्षातील ध्येय धोरणांचा, कार्यप्रणालीचा, यशअपयशाचा आढावा घेतल्यानंतर सर्व पक्ष संघठन बर्खास्त करून त्याची पुनर्रचना केली व पक्ष संघटना बांधनीचे आदेश दिले याशिवाय पक्षसदस्यता मोहीमे सोबतच कार्यकर्त्यांनी पक्ष निधी उभारावा असाही आदेश दिला. आगामी निवडणूकात बीआरएसपी भाजपा व त्यांचे मित्रपक्ष ज्यांनी देशात आणि राज्यात शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, ओबीसी, व अल्पसंख्यांक यांच्या विरोधी विविध धोरणे व कार्यक्रम ठरविल्यामुळे शिवाय देशात मनुस्मृतीप्रणित शासन व समाज व्यवस्था निर्मिण्यासाठी भाजपा व्दारा बहुजन महापुरूषांचा अपमान करने महिलांचा अपमान करने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे शालेय पुस्तकातून अस्तित्व मिटवने, बनारस हिंदू विद्यापीठ सारख्या विद्यालयामध्ये मनुस्मृती वरती शैक्षणिक कोर्स ठरवून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हे धोरण ठरवून भारतीय लोकशाहीला व राज्यघटनेला हानीकारक असल्यामुळे भाजपा विरोधातील राजकारण मजबूत करनार असुन महाराष्ट्रात भाजपा-आरएसएस विरोधातील आघाडी पक्षामध्ये बीआरएसपी महत्वाची भुमिका पार पाडेल असेही अँड. डॉ.सुरेश माने सरांनी सांगीतले. याप्रसंगी पक्षातर्फे आगामी ६ महिण्यात निश्चित कार्यक्रम ठरविला असुन त्यानुसारच पक्ष कार्यकर्त्यांनी कार्यशील व्हावे असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले असून पक्षाची संघटना व निवडणूक यंत्रणा याची सुध्दा त्रैमासिक समिक्षा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका विधानसभा-लोकसभा यांच्यासाठी पक्षातर्फे तैयारी केलेली आहे. यामध्ये नागपूरातील मनपाच्या ७५ जागेवर व पुर्व विदर्भातील १० जागेवर विधानसभा जागेवर पक्षातर्फे लक्ष केंद्रित केले आहे.
पक्षातर्फे जून महिण्यामध्ये चंद्रपूर व नागपूर या दोन ठिकाणी भव्य मेळावे आयोजित केले जाणार असून या मेळाव्यासाठी भाजपा – आरएसएस विरोधातील अनेक पक्ष संघटना नेते यांना देखील निमंत्रीत केले जाणार असून भंडारा जिल्हयातील गोसिखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षातर्फे भंडारा जिल्हा, जिल्हाधिकारी कार्यालयावरती लवकरच एक भव्य मोर्चा करण्याचे ठरले आहे.
याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, पुर्व विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, महिला संयोजिका महिला आघाडी विश्रांती झांबरे, जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद रंगारी, शहर अध्यक्ष मोरध्वज अढाऊ, महिला आघाडी अध्यक्ष वंदना लांजेवार, सी.टी.बोरकर, एस.टी.पाझारे, प्रा.मंगला पाटील, पंजाबराव मेश्राम, उपस्थित होते.