शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून एलईडी व संगणक चोरट्याने पळवले

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी

आंधळगाव पोलिसांना आव्हान

मोहाडी : तालुक्यातील सालई खुर्द येथील इंदूताई मेमोरियल हायस्कूल शाळेतील पंन्नास हजार रुपये किमतीच्या एलईडी टिव्ही व संगणक चोरट्याने पळविल्याची घटना बुधवार दि.८ जून २०२२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाळेत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना मिळताच पोलिस बिट अंमलदार गणेश मते हे घटनास्थळी दाखल झाले, तपास चक्रे वेगाने फिरवत भंडारा येथुन ठसे तज्ञांना व स्वान पथक बोलविण्यात आले. पथकातील अधिकाऱ्यांनी फिंगर प्रिंट घेतले आहे. स्वानं पथकाने चोराचा शोध घेतला, मात्र पुढे स्वान पथक सरकू शकले नाही.चोरटा आड मार्गाने गेला असावा असा स्वान पथकाकडून लावल्या जात आहे.

तालुक्यातील सालई खुर्द येथील इंदूताई मेमोरियल शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, यासाठी शिक्षकांनी टीव्ही व संगणक बसविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना टीव्ही व संगणक ज्ञानाचे धडे देण्यात आले. शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा बंद होती. अज्ञात चोरट्याने मंगळवार रात्रीच्या वेळी याचा फायदा घेत चोरट्याने शाळेच्या कार्यालयाचे कुलूप एकसाब्लेडने तोडल्याने. आत प्रवेश करून फळ्याला लावण्यात आलेली बॉक्समध्ये असलेल्या एलईडी व संगणक चोरट्याने पळविल्याची घटना बुधवार सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक ग्यानिराम मस्के यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वी.क.४६१,३८०, अप क्रं ९३/२०२२ प्रमाणे आंधळगाव
पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तहसील कार्यालयात फेरफार अदालत

Wed Jun 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 08:- प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरण व अन्य समस्यांचे निराकरण करणे तसेच सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालि काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विमला बी यांच्या मार्गदर्शनार्थ 1 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 पर्यंत महाराजसव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!