कामठी तहसील कार्यालयात फेरफार अदालत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 08:- प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरण व अन्य समस्यांचे निराकरण करणे तसेच सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकालि काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विमला बी यांच्या मार्गदर्शनार्थ 1 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 पर्यंत महाराजसव अभियान राबविण्यात येत आहे .या महाराजस्व अभियान अंतर्गत आज 8 जून ला कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार ब्रह्मनोटे, यांच्या मुख्य उपस्थितीत एक दिवसीय फेरफार अदालत आयोजन करण्यात आले होते.
यानुसार आज झालेल्या फेरफार अदलतीत अधिकाधिक शेतकरयानी सहभाग नोंदविला असून या अदालतीत सातबारा फेरफार, खरेदी वारसान फेरफार, हक्क सोड़, बक्षीस पत्र, शेताची रजिस्ट्री,अधिकार अभिलेख आदि कामे पाहण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील एकूण पाच मंडळातील एक महिन्याच्या वरील एकूण 41 फेरफार निकाली काढण्यात आले.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत आज कामठी तहसील कार्यालयात पार पडलेल्या फेरफार अदलतीत तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसीलदार राजीव ब्रह्मनोटे , मंडळ अधिकारी महेश कुल्दीवार, मंडळ अधिकारी संजय अनव्हाणे,मंडळ अधिकारी ,संजय कांबळे, यासह तलाठी वर्ग , आदिनी महत्वाची भूमिका बजावली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील ९३.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Wed Jun 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस कामठी, ता.३: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.४४ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्याचा बारावीचा निकाल ६ टक्क्यांनी कमी लागला असून तालुक्यातील १२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य मंडळाच्या परीक्षा होम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com