जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव

नागपूर :-जुनी पेन्शन योजना हा शासकीय कर्मचाऱ्यांना हक्क आहे. परंतु, कर्नाटक राज्यातील भाजप सरकारने तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक अशा सर्वांमध्येच नाराजी होती. विधानसभेच्या निवडणुकीत या सर्व जनतेने मतदानाच्या रुपात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जुनी पेन्शन योजना नाकारल्याने भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आपली नाराजी मतदानातून दर्शवित शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून बाहेर खेचतील, अशी प्रतिक्रिया नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

Sun May 14 , 2023
‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा :- शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!