एम डी तस्करबाजास अटक, चार आरोपीस अटक,1 लक्ष 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरकर चौकातून मोपेड दुचाकी क्र एम एच 40 सी एम 4934 ने अवैधरित्या एम डी सदृश्य अंमली पदार्थ बाळगून तस्करी करीत असता रात्रगस्तीवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून चारही एम डी तस्करबाजास अटक करून त्यांच्याकडून 6.28 ग्राम एम डी सदृश्य अंमली पदार्थ किमती 28 हजार रुपये, 3 महागडे मोबाईल किमती 38 हजार रुपये व दुचाकी किमतो 70 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 36 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केल्याची यशस्वी कारवाही गतरात्री केली .

अटक आरोपीमध्ये अनावरुल हसन,एहत्येश्याम शहजाह, अब्दुल कासीम ,जुबेर हसन सर्व रा बकरा कमेला कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी,एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, एपीआय गुबे , एपीआय जितेंद्र ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com