फेक ट्रेडिंग अकाऊंटमध्ये फसवणुक झालेली रक्कम फिर्यादीस परत मिळवुन देण्यास सायबर पोलीस ठाणेला मोठे यश

नागपूर :- यातील फिर्यादी यांनी नोव्हेंबर २०२३ च्या दुस-या हप्त्यामध्ये फेसबुकवर स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमविण्याची जाहिरात बघितली त्यावर त्यांनी नोंदणी केले असता त्यांना मोबाईल कमांक नंबरवरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड करण्यात आले. सदर ग्रुपवर दररोज प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ज्या हिंट देण्यात येत होत्या त्याबाबत व्यवस्थित काम होत असल्याने फिर्यादी यांचा विश्वास बसला. प्रशिक्षणानंतर त्यांना WWW. Choiceses-india.com अशी लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यास सांगण्यात आले त्यानुसार फिर्यादी यांनी चॉईस ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये ट्रेडिंग अकाऊंट उघडले. सदर प्लॅटफॉमद्वारे आय. पी.ओ. मिळतात असे सांगण्यात आले त्याप्रमाणे फिर्यादी यांनी दिलेल्या खात्यावर सदर ट्रेडिंग अॅप रू. १९,९०,०००/- टाकण्यात आले. त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणुक झाल्याचे समजताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाणेला येवून तकार दिली असता उपरोक्त गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयात सायबर पोलीस ठाणे नागपूर शहर यांनी तातडीने तांत्रिक तपास करून मनी टेलचे विश्लेषण करून तात्काळ ज्या अकाऊंटमध्ये फिर्यादीचे पैसे गेले अशी ३ अकाऊंट गोठविले. तसेच न्यायालयीन प्रकियेनंतर सदर प्रकरणात फसवणुक झालेली रक्कम रू. १९,९०,०००/- फिर्यादीस परत मिळवुन देण्याबाबत मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री अर्चित चांडक, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे सायबर, नागपुर शहर तसेच एस. जी. पांढरे, सहा पो. निरीक्षक, व सायबर पोलीस ठाणे येथील टिम यांनी तांत्रीक कौशल्याचा व बुध्दी पाडली आहे. चातुर्याचा वापर करुन मोलाची कामगीरी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांचा रुटमार्च

Sat Mar 16 , 2024
नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रीया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने मॉक डिस्पर्सल प्रशिक्षण नागपूर ग्रामीण जिल्हयात विविध पोस्टे अंतर्गत रूटमार्च घेण्यात आले. आज दिनांक १४/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन खापरखेडा येथे १०.०० वा ते ११.०० वा पर्यंत माँब डिस्पर्सल प्रक्टिस व ११/१५ वा. ते १२/४५ वा. पर्यंत खापरखेडा टाऊन, वलनी, चणकापूर व सिल्लेवाडा येथे  धनाजी जळक, पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights