नागपूर ग्रामीण पोलीसांचा रुटमार्च

नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रीया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने मॉक डिस्पर्सल प्रशिक्षण नागपूर ग्रामीण जिल्हयात विविध पोस्टे अंतर्गत रूटमार्च घेण्यात आले.

आज दिनांक १४/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन खापरखेडा येथे १०.०० वा ते ११.०० वा पर्यंत माँब डिस्पर्सल प्रक्टिस व ११/१५ वा. ते १२/४५ वा. पर्यंत खापरखेडा टाऊन, वलनी, चणकापूर व सिल्लेवाडा येथे  धनाजी जळक, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खापरखेडा यांचे मार्गदर्शनाखाली रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च करिता १ पो.नी १ सपोनी ०४ पोउपनि व RPF पथक RCP पथक असे ६० पोलीस अमलदार हजर होते.

पोस्टे उमरेड येथे आज रोजी सकाळी ९/३० वाजता ते दुपारी १२/४५ वाजता दरम्यान आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्य उमरेड शहर, राजूरवाडी, व मांडवा गावात रूट मार्च, कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले सदर कार्यक्रमात पोस्टे उमरेड तर्फे सपोनि कुणाल रामटेके, मसपोनि मलकुवार मॅडम, पोउपनी भरवींद्र वाघ व पोस्टेचे २१ अंमलदार व Rpf पथक मुंबई पश्चिम रेल्वे चे दोन अधिकारी व २२ अंमलदार हे रूटमार्च व कोम्बिंग ऑपरेशन करीता असे एकूण ५ अधिकारी व ४३ अंमलदार हजर होते.

दिनांक १२/०३/२०२४ रोजी १६/०० वाजता पासून ते १७/१५ वाजता पर्यंत संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग कन्हान, दीपक अग्रवाल , ए एस पी, (IPS) उमेश पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यांचा उपस्थितीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये ०८ अधिकारी २५ RPF अंमलदार २२ अंमलदार व होमगार्ड उपस्थित होते.

दि. १३/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे ११/०० वा ते १८/३० वा पर्यंत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक यांचेसह पोलीस स्टेशन हद्दीमधील दहेगाव जोशी, करंभाड, तामसवाडी, पालोरा, नयाकुंड, नवेगाव खैरी, चारगाव, पालासावळी गावामध्ये व पारशिवनी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च करिता २ पो.नि. ०३ पोउपनि व RPF पथकातील २२ जवान, पोलीस स्टेशनचे १२ अंमलदार व १२ होमसैनिक हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकरी यांनी त्यांच्या शेतात काढून ठेवलेला चना तुर व गहु आरोपीने रात्री दरम्यान चोरून नेला आरोपीला बु‌ट्टीबोरी पोलीसांनी केले मालासह अखेर जेरबंद

Sat Mar 16 , 2024
बु‌ट्टीबोरी :- सोनेगाव बोरी शिवारातील शेतकरी नामे शैलेश गोविंदराव खापने व विनोद महादेव निमकर दोन्ही रा. सोनेगाव बोरी यांनी आपले शेतात लागवड करून मशीनने काढून ठेवलेला चना, तुर व गहू असा एकूण १,४२,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले  यातील दोन्ही फिर्यादी यांनी पो.स्टे. बु‌ट्टीबोरी येथे येवून तोंडी रिपोर्ट दिल्याने पो.स्टे. बु‌ट्टीबोरी येथे १) अप. क्र. २०७/२४ कलम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights