रेल्वे अपघातात भूषण सोनटक्के या युवकाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नागपुर बॉयपास टेकाडी पुला खालील रेल्वे लाईनवर घटना, पोस्टे ला गुन्हा दाखल.  

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बॉयपास पुला खालील रामटेक इतवारी रेल्वे लाईनवर अपघाता त भूषण सेनटक्के या युवकाचा मृत्यु झाल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे.

पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहिती नुसार अमोल केशवराव सोनटक्के वय ३० वर्ष रा. नागपुर यांचे रामटेक ते कन्हान येथे आर.ओ.बी. रेल्वे लाईनचे काम मागील दोन महिन्यापासुन सुरु आहे. शनिवार (दि.४) मे ला सायंकाळी ४ वाजता दरम्यान आर ओ बी रेल्वे लाईन गटरच्या प्लेटफार्म माल ईरिकशन कामा निमि त्ताने नागपुर बॉयपास टेकाडी पुला खाली आला होता. म्हणुन मृतक भुषण केशवराव सोनटक्के वय २४ वर्ष रा. नागपुर हा तिथे ठाकरे इंजिनियरचा सुपरवाइ जर जितेंद्र नंदनवार सोबत थांबला होता.

रविवार (दि .५) मे ला सकाळी ९.४५ वाजता दरम्यान अमोल चा लहान भाऊ वैभव सोनटक्के यांनी भावाला फोन करुन सांगितले कि, भुषण हा रेल्वेने कटुन मरण पावला आहे. अमोल ने टेकाडी पुला खाली येऊन पाहिले तर त्यांचा भाऊ भुषण हा रामटेक इतवारी लाईन वर एक इलेक्ट्रिक पुलाखाली मृत अवस्थेत पडला होता. कन्हा न पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊ न शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णाल यात पाठविण्यात आला. अमोल सोनटक्के यांचा तक्रारीवरून पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ट्रक च्या धडकेत पती,पत्नी गंभीर जख्मी, उपचारार्थ पत्नीचा मृत्यु

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – टेकाडी पुला जवळच्या वळणावरील घटना, पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर बॉयपास टेकाडी पुला जवळील वळणावर अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन दुचाकीला धडक मारल्याने या अपघातात पती, पत्नी गंभीर जख्मी झाले असुन उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यु झाल्याने पोलीसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. प्राप्त माहिती नुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com