संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय,कामठी येथे आझाद हिंद ध्वजदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डॉ. सुधीर अग्रवाल होते.तर मंचावर कार्यक्रमाचे संयोजक प्रा .ज्ञानेश्वर रेवतकर होते.या प्रसंगी प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी आझाद हिंद ध्वज दिनाचे महत्त्व सांगितले.
नेताजींनी ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमान निकोबार द्वीपसमूहात आपल्याच सरकारमध्ये तिरंगा फडकावला होता.याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले आणि या बेटांवर भारतीय तिरंगा फडकाविला,असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.या प्रसंगी दिव्यानी काकडे, तनिषा उपरीकर या विद्यार्थीनींनीनी सुभाष चंद्र बोस यांच्या स्वांतत्र्य आंदोलनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन अंजली मेश्राम या विद्यार्थिनीने केले तर आभार अस्मिता बावणे हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रा.विश्वनाथ वंजारी, प्रा योगेश मर्चटवार, प्रा नरेंद्र मेंढे, प्रा पंकज वाटकर, प्रा आशिष वरटकर, प्रा आशिष क्षिरसागर, प्रा पंकज गौरकर प्रा जुबेर अहमद, प्रा वैशाली मस्के, प्रा मनोज सपाटे, प्रा गंधेवार, प्रा लोकेश्वरी रींके, प्रा. सुषमा, प्रा सुषमा ओझा, प्रा मत्ते वासनिक प्रा हर्षा सिडाम, प्रा शुभांगी बावनकुळे, प्रा रुपाली अढाऊ, प्रा श्वेता कायरकर, प्रा अनिता बैस, प्रा स्नेहल आदमने, प्रा मल्लिका नागपुरे प्रा किरण पेठे प्रा,किरण पुडके, प्रा वृंदा पराते आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.