चोऱ्या करणे बंद कर म्हटल्याने आरोपीने चाकु ने मारुन केले गंभीर जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ७ किमी अंतरावर असलेल्या गोंडेगाव येथे नरेश नेवारे किराणा जवळ भीमराव यानी चोऱ्या करणे बंद कर असे म्हटले असता आरोपी विजय मेश्राम ने चाकुने मारुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.७) सप्टेंबर ला भीमराव वल्द माणिक मेश्राम वय ४५ वर्ष रा. गोंडेगाव यास रोज मजुरीचे काम न मिळाल्याने घरीच हाजर होते. दुपारी २ वाजता नरेश नेवारे याचे किराणा दुकाना जवळ भीमराव बसण्याकरीता गेले तिथे गुलाब राऊत, सखाराम नेवारे, सेवक राऊत हे गावाचे लोक बसुन गोष्टी करत होते. दुपारी ३ वाजता दरम्यान आरोपी विजय भाऊराव पाटील वय ५४ वर्ष रा. गोंडेगाव हा मातामाय मंदिर कडुन नरेश नेवारे यांचे किराणा दुकानाजवऴ आला. तेव्हा भीमराव ने त्यास सहज म्हटले की गावात “चोऱ्या करणे बंद कर” असे म्हटल्याने विजय याने पॅंट च्या खिश्यातुन लोखंडी चाकु काढुन भीमराव यांचा अंगावर चाकु मारला असतांना भीमराव ने चाकु डावे हाताने अडविल्याने त्यांना डावे हाताला व डावे बोटाचे वर चाकु चा मार लागुन जख्मी झाल्याने विजय पाटील तेथुन पळुन गेला. भीमराव तेथुन घरी गेला नंतर पुतण्या लकी मेश्राम, अश्विन गज भिये यांनी भीमराव यांना दुचाकीवर बसवुन जे.एन. दवाखाना कांद्री येथे उपचार कामी नेले असता तेथुन सरकारी दवाखाना कामठी येथे रूग्णवाहिकेने नेले व तेथिल डॉक्टराने रेफर केल्याने मेयो हॉस्पीटल नागपुर येथे इमरजेंसी वार्डात उपचार सुरू आहे.

सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी भीमराव मेश्राम यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विजय पाटील याला अटक करुन त्याचे विरुद्ध अप क्र. ५८४/२३ कलम ३२४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते यांचे मार्गदर्शना त सहायक फौजदार सदाशिव काटे, महेंद्र जळीतकर हे करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Sat Sep 9 , 2023
मुंबई :-  गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com