मुंबई :-समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्तर भारतीय महासंघ या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन तसेच संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘साहित्य गंगा’ पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 8) राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश दुबे, माजी आमदार राजपुरोहित व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते ओ पी व्यास, पंडित कालीनाथ मिश्र, गिरीश मिश्रा, प्रशांत मलिक, के पी पांडे, कमलेश दुबे, आर पी व्यास, शैलेंद्र भरती यांसह ३५ व्यक्तींना ‘साहित्य गंगा’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.