– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
नागपूर :- दिनांक १५/०४/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथील बोथली फाटक शिवारातील उड्डाण पुलाचे खाली काही इसम है चारचाकी वाहनात IPL मधील लखनऊ विरूद्ध पंजाव यांचेमध्ये खेळल्या जाणान्या क्रिकेट सामन्यावर बैटिंग लावण्यावर अशा प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने बोथली फाटक शिवातील उड्डाण पुलाचे खाली सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे १) पंकज परसराम वाधवानी, वय ४७ वर्ष, रा. रा. महालक्ष्मी अपार्टमेंट दयानंद पार्क जवळ जरीपटका नागपूर २) अनिल मदनलाल अग्रवाल, वय ५४ वर्ष, रा. नेताजी चौक कामठी हे मारुती स्विफ्ट कार क्र. MH-31/ DC-3144 मध्ये मोबाईल फोनवर IPL मधील लखनऊ विरूद्ध पंजाब यांचेमध्ये खेळल्या जाणान्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावण्यावर जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०२ जुगारी इसम यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून १) मारुती स्विफ्ट कार क्र. MH- 31/ DC-3144 किंमती अंदाजे ३,००,०००/-रु. २) रेडमी कंपनीचा अॅडरॉईड मोबाईल किंमती अंदाजे ५०००/- रू. नोकिया कंपनीचा अँडरॉईड मोबाईल किंमत अंदाजे ३०००/- रू. दोन नोकीया कंपनीचे साधे मोबाईल किमती अंदाजे २०००/- रू. असा एकुण किमती अंदाजे ३,१०,०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद पोलीस ठाणे बुट्टीबोरी येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना जन्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोहवा. कावळे व नं. ४५१ मो. नं. ९९२३१९६९५४ हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार मिलोंद नांदुरकर, महेश जाधव, पोलीस नायक मयुर ढेकले, सत्यशीर कोठारे, अमृत निगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.