समाजकल्याण विभागाचा अन्याय कामठीतील गटई कामगारांना अद्याप स्टॉल वितरण नाही भाजपचे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्ताना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील जवळपास 18 चर्मकार कामगारांना 4 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा गटई कामगार चे स्टॉल समाजकल्याण विभागाने वितरण न केल्याने कामगारात असंतोष आहे.

भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांना नुकतेच निवेदन देऊन चर्मकार बांधवाना न्याय देण्याची मागणी केली.

शिष्टमंडळात भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले, नगर परिषद कामठी चे विरोधी पक्षनेते लालसिंग यादव,भाजपा नगर सेवक प्रतिक पडोळे यांचा समावेश होता

आनंद नगर कामठीतील भविन्द्र बर्वे,प्रकाश सोनेकर,प्रल्हाद सोनवाने,मुन्नालाल खरोले,महिपाल मोहबे,शंकर तांडेकर, मोतिराम भोंडेकर,भोजराज बर्वे,भारती कनोजे, लिला जगणे यांच्या सह 18 चर्मकार कामगारांनी 2018 मध्ये गटई स्टॉल करिता समाज कल्याण विभाग नागपुर येथे विहित नमुण्यात न प कामठी च्या ना हरकत पत्रा सह 100 रूपयांच्या स्टेम्प पेपर वर हमी पत्र देऊन गटई स्टॉल साठी अर्ज केले होते.

परंतु 4 वर्ष उलटून ही त्यांना अद्याप गटई स्टॉल मिळाले नाही याकडे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त तेलगोटे यांचे लक्ष वेधण्यात आले.

भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी चर्मकार बंधुना उन्हातान्हात फुटपाथ लगत बसून पादत्राण दुरुस्ती विक्रीचे काम करावे लागते,पावसाळ्यात त्यांना खुप त्रास होतो शासना कडून दुर्लक्षित चर्मकार बांधवाना लवकरात लवकर गटई स्टॉल देण्यात यावे अशी मागणी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्या कडे केली.

याबाबत पाठपुरावा करून लवकरच कळविण्यात येईल असे आश्वासन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Feb 14 , 2023
करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन नाशिक : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.            आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com