पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत

मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उदघाटन करण्यात येणार असून बृहन्मुंबई मनपाच्या २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे देखील उदघाटन होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया, रुग्णालय बांधकाम व पुनर्विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समारोपीय समारंभाच्या प्रवेशिका उपलब्ध, खासदार क्रीडा महोत्सवाचे ग्लोकल मॉल कार्यालय आणि यशवंत स्टेडियममध्ये साधा संपर्क

Thu Jan 19 , 2023
अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी २२ जानेवारी २०२३ रोजी यशवंत स्टेडियम येथे होणार आहे. या समारंभात सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम नि:शुल्क असून कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशिका खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमधील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com