29 गोवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवनदान..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 8 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव फाट्याजवळून एका सहाचाकी ट्रक मधून अवैधरित्या करीत असलेल्या गोवंश जनावरांच्या वाहतुकिवर नवीन कामठी पोलिसांनी धाड घालीत ट्रक मधून कोंबून नेत असलेल्या 29 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही नुकतेच साडे आठ दरम्यान केली असून या धाडीतून जप्त सहा चाकी ट्रक क्र एम एच 34 बी जी 7349 किमती 10 लक्ष रुपये व जप्त 29 बैल किमती 4 लक्ष 35 हजार रुपये असा एकूण 14 लक्ष 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चार आरोपीविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

अटक आरोपीमध्ये शितलसिंग राठोड वय 34 वर्षे रा टेकानाका नागपूर,रवींद्र भारती वय 22 वर्षे रा भिलाई, छत्तीसगढ, मो सादिर मो बाशीर वय 42 वर्षे रा मोमीनपुरा नागपूर,मो शफाकत मो शफी वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, दुय्यम पोलीस निरीक्षक गड्डीमे,डी बी स्कॉड चे संदीप सगणे, संदेश शुक्ला, सुरेंद्र शेंडे,कमल कनोजिया,अनिकेत सांगळे,प्रभू भगत, कुंडलिक परतले यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेच्या "भारत माता की जय" च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी..

Mon Aug 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी हरघर तिरंगा  करिता जनजागृती पर रॅली.  कन्हान : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने ” सन्मान तिरंगा ” जनजागृती रॅली आज ( दि.८) कांद्री नगराचे भ्रमण करित “भारत माता की जय” च्या विद्यार्थ्यांच्या जय घोषणेने कांद्री नगरी दुनदुमली. धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चवथी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com