गोवंशीय जनावरांना निर्दयतेने व क्रूरपणे बांधुन कत्तली करण्याकरीता वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक

कामठी :- अ) दिनांक २०.१०,२०२४ चे ००.५० वा. चे सुमारास, नविन कामठी पोलीसांचे पथक हे कामठी रोड, साई मंदीर जवळ नाकाबंदी राबवित असता एक संशयीत आयशर वाहन क. एम. एच ४० सि.टी ४७२२ यास थविण्याचा ईशारा केला असता त्यांचे चालकाने वाहन न थांबविता कामठीच्या दिशेनी पळविले, त्याचा पाठलाग करून त्यास आउटर रोड, ऊंटखाना परीसरात थांबविले, वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद आबीद अली वल्द सबीद अली वय २७ वर्ष रा. कोळसा टाल, भाजी मंडी, जुनी कामठी, नागपूर असे सांगीतले. त्याचे वाहनाची पाहणी केली असता, वाहनाचे मागील डाल्यात एकुण १६ जिवंत गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे १,६०,०००/- रू. चे निदर्यतेने कोंबुन, अवैधरित्या कत्तलीकरीता वाहतुक करीत असतांना घेवून जात असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चालक वास विचारपूस केली असता, त्याने नमुद गोवंश हे ईरफान कुरेशी वय ३२ वर्ष रा. भाजी मंडी कामठी, नागपूर याचे सांगण्यावरून कत्तली करीता लाड कारंजा, वर्धा येथे नेत असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यातुन नमुद १६ गोवंशीय जनावरे यांची सुटका करून सुकृत गौशाला व कल्याणकारी संस्था, पिंपळगाव, लाखणी येथे पाठविण्यात आले आहे. आरोपीचे ताब्यातुन गोवंशीय जनावरे व ट्रक असा एकूण ७,६०,०००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी फिर्यादी पोअं. अमोल डोंगरे पोलीस ठाणे नविन कामठी नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ५(अ), ५(य), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५. सहकलम ११(१) (ए) (एफ) (डी) प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम १३४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ब) दिनांक २०.१०.२०२४ चे ०२१० वा. चे सुमारास, नविन कामठी पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून पोलीस ठाणे हद्दीत जबलपूर नागपूर आउटर रिंग रोड, आवंडी गावाचे वळणावर येथे ट्रक क्र. एम.एच ३१ डी.एस ७७८६ ला चांववुन रेड कारवाई केली असता, वाहनात एकुण १२ जिवंत गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे २,४०,०००/- रू. चे निदर्यतेने कोंबुन, अवैधरित्या कत्तलीकरीता वाहतुक करीत असतांना घेवुन जात असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चालकास त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सय्यद फारूख सय्यद रशीद वय ३४ वर्ष, रा. भाजीमंडी, कामठी, नागपूर असे सांगीतले. वाहन चालक यास विचारपूस केली असता, त्याने नमुद गोवंश है ईरफान कुरेशी वय ३२ वर्ष रा. भाजीमंडी, कामठी, नागपूर याचे सांगण्यावरून कत्तली करीता लाड कारंजा, वर्धा येथे नेत असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यातुन नमुद १२ गोवंशीय जनावरे यांची सुटका करून सुकृत गौशाला व कल्याणकारी संस्था, पिंपळगाव, लाखणी येथे पाठविण्यात आले आहे. आरोपीचे ताब्यातुन गोवंशीय जनावरे व ट्रक असा एकुण ११,४०,०००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी फिर्यादी पोअं. आकाश मनवर पोलीस ठाणे सदर नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि. तिडके यांनी आरोपींविरूध्द कलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(१) (ए) (एफ) (डी) प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम १३४, १७७ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com