संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी प्लाॅट नं ३ बाळबुधे ले-आऊट टेकाडी येथे शिवम टायर रिमोडिंग च्या दुकानात दोन आरोपींनी दुकानदार व त्याच्या वडी लाला लाकडी दंड्याने व हातबुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने पोस्टे कन्हान येथे पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे .
प्राप्त माहिती नुसार आकाश प्रकाशजी वंजारी वय २८ वर्ष रा. मरार टोली कलमना रोड न्यु येरखेडा कामठी यांचे राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील प्लाट नं ०३ बाळबुधे लेआऊट टेकाडी येथे शिवम टायर रिमो डिंग चे दुकानात टायरचा व्यवसाय असुन ट्रक टायर ची विक्री असुन कन्हान येथील ट्रक ट्रांसपोर्टर टायर विकत घेतात. (दि.२६) एप्रिल ला आकाश वंजारी यांचा दुकानातुन खुर्शिद सिद्धीकी रा. कांद्री-कन्हान याने एक ट्रक चा टायर ८००० रूपयास विकत घेतला . आकाश वंजारी यांनी टायरचे बिल सुध्दा दिले आणि सदर टायर ची दोन महीने वॉरंटी असल्याचे सुध्दा त्या ला सांगीतले होते. (दि.२९) मे ला खुर्शीद सिध्दीकी याला आकाश वंजारी याने विकलेला टायर दिलेल्या वांरटीच्या आत मध्ये फुटल्याने दुसरा टायर दिला. गुरुवार (दि.२८) जुलै ला सांयकाळी ५ वाजता आका श वंजारी हे आपल्या दुकानात काम करत असता तेथे खुर्शिद सिध्दीकी व धर्मेन्द्र भावनाथ सिंग हे दोघे आले आणि आकाश वंजारी ला बोलले कि “तु तिसरा टायर दे, तर टायर फुटला का ? त्याचा वॉरटी चा पिरेड संपला. मी तुला दोन टायर देवुन झाले ” असे बोलत असतांना आकाश वंजारी याला हातभुक्कीने मारहाण करायला सुरूवात करून खुर्शिद सिध्दीकी यांनी आकाश वंजारी याचे हात पकडले व धर्मेन्द्र सिंग याने आकाश वंजारी याला मारायला सुरूवात केली असता तेवढ्यात आकाश वंजारी यांचे वडील भांडण सोडवा यला आले असता त्यांना सुध्दा हातभुक्याने मारहाण केली. धर्मेन्द्र सिंग यांनी हातात लाकडी डंडा घेवुन येत आकाश वंजारी च्या पाठीवर दंड्यानी मारहाण केली व त्याच्या वडीलांना ढकल दुकल करित खाली पाडले आणि शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी आकाश वंजारी यांच्या तोंडी तक्रारू वरून पोस्टे ला आरोपी खुर्शिद सिध्दीकी व धर्मेंद्र सिंग यांचा विरुद्ध अप क्र. ४६०/ २२ कलम ३४२, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.