कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :- कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे नाईकवाडी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

Thu Sep 14 , 2023
मुंबई :- बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक, विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून सुधारणा व सूचना मागविण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी गत पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री श्री. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com