जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोटीतून शिक्षा

पो.स्टे. अरोली :- फिर्यादी नामे- राजकुमार फुलचंद शेटे, वय ३८ वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. अरोली येथे अप. क्र. ६२/२०२० कलम ३०२ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील मृतक नामे- दिगीवर जागोवा घुले, वय ५२ वर्ष रा. रेवराल ता. मौदा व आरोपी नामे- मुरलीधर कानुनी ढोमणे, वय ४० वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांचे घर एकमेकाला लागुन असुन नमुद घटना घडली त्या वेळी व ठिकाणी मृतक व आरोपी यांच्यात घरासमोरील अंगणाच्या जागेवरुन वादविवाद होवुन यातील आरोपाने मृतक यास लाकडी दांडयाने मृतकाच्या डोक्यावर, छातीवर मारून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मृतक हा मरण पावला.

सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २४/०५/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. देशमुख यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३०२ भादवि मध्ये आजिवन कारावास व ५०००/- रु. दंड. दंड न भरल्यास ०१ महीना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोशि/ १२०२ उमेश पाल पो. स्टे अरोली यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

Thu May 25 , 2023
सातारा  :- पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजभवन, महाबळेश्वर येथे राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा येथे पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर (मरळी), ता. पाटण परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली. दौलतनगर येथील विकास कामाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights