अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पंचायत समितीचे दोन कर्मचायावर 17 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार हे विस्तार अधिकारी असुन वैद्यकीय रजेची फाईल मंजुरी करण्यासाठी आरोपी प्रदिप बन्सोड सहायक प्रशासन अधिकारी पंचायत समिती तिरोडा,यांने 7 हजार व आरोपी प्रमोद मेश्राम वरिष्ठ सहायक पंचायत समिती तिरोडा यांचा करिता 10हजार रुपये असे एकूण 17 हजारांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाँच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्रदिप बन्सोड व प्रमोद मेश्राम यांना पंचाक्षम लाचेची मागणी केली लाचेची रक्कम आरोपी बन्सोड यांच्याकडे देण्यासाठी सांगितले.परंतु त्याला संशय आल्याने बन्सोड याने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.आरोपी प्रमोद मेश्राम याला ताब्यात घेण्यात आले असुन आरोपी प्रदिप बन्सोड यांचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे कलम 7भष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.