जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणार्य आरोपीतांना अटक एकुण 29,40,000/-रू चा मुद्देमाल जप्त

 नागपूर –  नागपूर जिल्हयात राबवलेल्या कोबींग ऑपरेशन तसेच नाकाबंदी दरम्यान पो.स्टे. केळवद येथील ठाणेदार सपोनि  अमितकुमार आत्राम सोबत स्टाफ हे रात्री दरम्यान कोबींग ऑपरेशन व बिहाडा फाटा येथे नाकाबंदी डयुटी करीत असतांना त्यांना मिळालेल्या खबरेवरून मध्यप्रदेश मधुन हैद्राबाद येथे कत्तलीकरीता अवैध जनावराची वाहतुक करणारा 10 चक्का कंटेनर युपी-77/एटी -2157 या वाहनास थांबवून त्यामधील कत्तलीकरीता वाहतुक होत असलेल्या 47(बैल, गोवंष) कि. 9,40,000/-रू. चे जनावरे व 10 चक्का कंटेनर युपी-77/एटी -2157 कि. 20,00,000/-रू. असा एकुण किंमती 29,40,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी नामे- 1) इमरान खान मो इर्शाद वय 32 वर्ष नई बस्ती राजपुर न सिकंदर जि कानपुर उ.प्र, 2) वीर पाल रामप्रकाश वय 20 वर्ष रा. वैना त . सिकंदर जि. कानपुर (उ.प्र), 3) वाजीद नूर हसन वय 29 वर्ष कैलासपुर त सारंगपुर जि. सारंगपुर (उ.प्र), 4) मो. वसीम मो. शफिक वय 33 वर्ष कैलासपुर, सारंगपुर जि. सारंगपुर (उ.प्र), 5) फहीम अहमद करीम बक्श वय 26 वर्ष रा. साजापुर त. भोगणीपुर जि. कानपुर (देहात)(उ.प्र) यांच्या विरुध्द पो.स्टे. केळवद येथे कलम 11(1)(घ)(ड)(च) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा, सहकलम 5(अ), 9 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम तसेच कलम 279, 34 भादवी व सहकलम 184 मोवाका काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अमितकुमार आत्राम हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण  विजयकुमार मगर,अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अजय चांदेकर यांचे मार्गदर्शनात  ठाणेदार सपोनि अमितकुमार आत्राम, सफौ सुभाष राठोड, पोशि सचिन येळकर, श्रीधर कुलकर्णी, पंकज कोहाड व चालक नापोशि गुणवंता डाखोळे यांनी केलेली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com