अमरावती : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे दि. 7 ते 11 नोव्हेंबर, 2022 दरम्यान संपन्न होत असलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती याठिकाणी होणार आहे.
चमूमध्ये गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शिटाकळीची प्रगती इंगले, पायल श्रीनाथ व अंजली धानोरकर, जी.एस. महाविद्यालय, खामगांवची अन्नू सराप व जयश्री बुंदेले, डी.सी.पी.ई., अमरावतीची आशु राठोड, जान्हवी बोडाखे, प्राजक्ता खालकर व श्रृतिका खंडारे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची धरती टापरे, बॅ.आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेरा रेल्वेची स्नेहा चौधरी, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाडची सारिका शिंदे, मंजुळा पवार व पायल राठोड, श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगांवची वैष्णवी बोके, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची प्रिती शिरसाठ व आरती खिलारे हिची निवड करण्यात आली आहे.