मिठानगर परिसरातील सुरक्षा‍ भिंत धोकादायक असल्याबाबत तत्काळ चौकशी करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- मिठानगर परिसरातील जुन्या इमारतीच्या आजुबाजूला असलेली सुरक्षा भिंत धोकादायक असल्याच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

गोरेगाव पश्चिम येथील पी.साऊथ वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. आमदार विद्या ठाकूर, यावेळी तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, पांडुरंग वाडी सेंट थॉमस शाळेच्या मैदानापासून ते रोड नंबर ६ पर्यंतचा रस्ता महिनाभरात बनविण्यात यावा. गोरेगाव सुभाष नगर येथील मंगलमूर्ती बिल्डींग येथे एस.आर. इमारतीत पाण्याचे देयक व मालमत्ता कर जास्त घेतला असेल तर तो कमी करावा तसेच येथील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी. आरे कॉलनीतील रस्त्याच्या दुरूस्तीबाबत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. गोरगाव परिसरात बेकायदेशीर पार्कींग मध्ये कोणतेही अनाधिकृत बाबी घडत असल्यास पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, असेही मंत्री लोढा यावेळी म्हणाले.

नागरिकांनी विविध २२५ विषयासंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ८० अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Sat Nov 12 , 2022
मुंबई :- आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत मंत्री दीपक केसरकर बोलत होते. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com