बाभूळगाव येथे उच्च प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी फुलविले शैक्षणिक प्रदर्शन

– टीआयपी कार्यक्रमात शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

यवतमाळ :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ आणि ‘सिखें’ संस्था यांच्या संयुक्त समन्वयातून ‘टीचर इनोव्हेटर कार्यक्रम’ (टीआयपी) सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषयाच्या पद्धती शिकवल्या जात आहेत. या आधारावर विविध प्रकारचे मोड्युल तयार करून पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे व पालकांचे मन जिंकले. शिवाय पाहुण्यांनी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तर देत आपण काय शिकलो, याचे प्रात्यक्षिकही घडविले. हा शैक्षणिक सोहळा बाभूळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पार पडला.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून बाभूळगाव तालुक्यात पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिखें मुंबई, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त माध्यमातून टीचर इनोव्हेटर कार्यक्रम राबविल्या जात आहे. या कार्यक्रमात भाषा आणि गणित विषयाच्या शिकवण्याच्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना दोन टप्प्यात देण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी या सर्व पद्धती विद्यार्थ्यांसोबत वर्गात घेतल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तरात वाढ होण्यास मदत झाली. सोबतच सिखें संस्थेने विद्यार्थ्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांना सराव करण्यात अधिक संधी मिळाली. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत या पद्धतीवर आधारित मॉडेल तयार करून कार्यक्रमात प्रदर्शित केले.

उच्च प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे झालेल्या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून ‘सिखें’चे राज्य प्रमुख शरदचंद्र पाटील, जिल्हा समन्वयक संभाजी भिसे, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृतीविषयी पाहुण्यांना विस्तृत माहिती दिली. विद्यार्थी अभिव्यक्त होत आहेत. शिकलेल्या गोष्टी आपल्या शब्दात मांडत आहे. याबाबत सर्वांनीच आनंद व्यक्त केला. प्रभात फेरीने सुरूवात करून संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाभूळगाव शाळेचे केंद्र प्रमुख शशिकांत खडसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली मोरकुटे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांस पालक सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्तीसगढ़ की सीनियर महिला हॉकी टीम नेशनल हेतु आज पुणे रवाना 

Mon Mar 11 , 2024
राजनांदगांव :- दिनाक 13 से 23 मार्च 2024 तक पुणे (महाराष्ट्र) में आयोजित 14वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय हॉकी चैंपियनशिप हेतु राज्य की हॉकी टीम नागपुर पुणे एक्सप्रेस में नागपुर से पुणे (महाराष्ट्र) के लिए आज रवाना हो गई है । छत्तीसगढ़ हॉकी के अध्यक्ष फ़िरोज़ अंसारी के मार्गदर्शन व हॉकी कोच अनुराज श्रीवास्तव एवं शकील अहमद तथा बलविंदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com