दूर देशी गेला बाबा..सलीलच्या आर्त स्वराने रसीकांना गहीवरले

· आयुष्यावर बोलू काही मैफीलीला रसीकांचा उदंड प्रतिसाद

· महासंस्कृती महोत्सवाचा समारोप

भंडारा :- दूर देशी गेला बाबा..गेली कामावर आई..नीज दाटली डोळयात घरी कोणी नाही..सलील कुलकर्णीच्या आर्त स्वराने रेल्वे मैदानातील रसीकांच्या डोळयांच्या कडा पाणावल्यात. कामाला गेलेले आई वडील आणी फलॅट संस्कृतीत कोंडलेलं बालपण अलगद नजरेसमोर आलं. गाणं संपल्यावरही स्तब्धततेची साय पसरली होती.

कार्यक्रमस्थळी रसीकांनी सायंकाळी पाच वाजतापासून गर्दी केली होती. आयुष्यावर बोलू काही या महासंस्कृतीच्या समारोपीय मैफीलीला रसीकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अस्मर, न्यायाधिश मा.खुणे, न्यायाधिश मा.आवारी, यासह सर्व न्यायाधिश उपस्थित होते. सलील-संदीपच्या जोडीने व त्यांच्या संचासह आलेल्या वादय-वृंदानी रसीकांना साहित्यातील नवरसाचा समावेश असलेल्या कविता-गीत-गझल-व विशेषत बालगीतांनी उपस्थितांच्या मनावर गारूड केले.

नसतेस घरी तू जेव्हा..जीव तुटका तुटका होतेा..या गाण्यासाठी जिल्हाधिका-यांनीही सूर लावला. मी मोर्चा नेला नाही..मी संपही साधा केला नाही..हे संदीप खरेनी सादर केलेल्या गीतावर उपस्थितांनी टाळयांचा ठेका धरला. एकटी एकटी घाबरलीस ना..या लहानग्यांच्या गीताला ही प्रतिसाद मिळाला.

ज्यांना गायचे असेल त्यांनी साथ संगत करायला या, असे आवाहन सलीलने केल्यावर भंडा-यातील अवधुत गजलावार या लहानग्याने निरागस स्वरात हॅलो..रॉग नंबर लागला राव.. हे गीत सादर केले. त्याला शाबासकी देत सलील-संदीपने त्याचे कौतुक केले. या गीताला रसीकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले.

रात्री दहा वाजेपर्यत रसीकांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर मैफीलीला रंग चढत गेला. अग्गोबाई ..ढग्गेाबाई या गीतावर लहान मुले ठेका घेत नाचत होती. अनेक रसीक कुटुंबासह आले होते. विशेष:त सलील-संदीपचा हा भंडाऱ्यातील पहीलाच कार्यक्रम होता. आतापर्यत जगभरात या कार्यक्रमाचे 1800 हून अधिक प्रयोग झाले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांनी महासंस्कृती महोत्सवात सहभागी कलावंत व हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रमलेल्या सर्वांचे आभार मानले.

NewsToday24x7

Next Post

रयतेचा राजा उतरले रसिकांच्या पसंतीला

Thu Feb 1 , 2024
भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या पाच दिवसाच्या महासंस्कृतीक महोत्सवात व्यावसायिक कलाकारांसोबतच स्थानिक कलावंतांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल भंडाराकरांनी प्रथम च अनुभवली दरम्यान दिनांक २९ जानेवारी २०२४ ला भंडाऱ्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या असर फाउंडेशन च्या कलाकारांनी “रयतेचा राजा” ही नृत्यनाट्य कलाकृती ७० गुणी कलाकारांसह सादर केले. तत्कालीन परिस्थिती वर आधारित “जाणता राजा” नाटक भांडारेकरांनी तिथेच बघितले पण सत्य परिस्थितीतील आणि छत्रपती शिवाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com