बखारी गावात बिबट्याने केली बकरी फस्त 

कन्हान :- कन्हान नजीक असलेल्या बखारी गावात बिबट्याने  बकरी फस्त केल्याची घटना ( मंगळवार 09 मे ) रोजी सकाळी 8 :00 वाजता दरम्यान उघड़कीस आली . पुन्हा गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावकऱ्यामध्ये धास्ती वाढली आहे

बखारी गावातील रहवासी कृष्णा गावंडे हे शेळीपालन करतात . सकाळी उठून चारा पाणी देण्यासाठी घराबाहेर असलेल्या गोट्यात आल्या नंतर कळले की रात्रि बांधून ठेवलेल्या शेळी मधील एक शेळी नाही आहे . फरफटत निशाना वरुन शोध घेतला असता . काही अंतरावर हिंस्र प्राण्याने शिकार केल्याचे दिसून आले . वनविभागाला माहिती देण्यात आली रामटेक वन परिक्षेत्र अधिकारी ए. बी.भगत , रेंजर ऑफिसर पटगोवारी ए.सी. दिग्रसे , वनरक्षक एस. जी. टेकाम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली .पंचनामा अंती शिकार बिबट्याने केली असल्याचे स्पष्ट झाले . तरी पशु मालकाला भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NVCC New Membership Scrutiny Committee द्वारा चेंबर में नए सदस्य बनाए गए

Wed May 10 , 2023
नागपूर :- नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स के प्रशासक यु.सी. नाहटा द्वारा द्वारा चेंबर में नए सदस्यों की अर्जी ¼application½ स्वीकृत करने हेतु ÞNVCC New Membership Scrutiny Committee” का गठन किया गया है। दि. 8 मई 2023 को समिती की प्रथम सभा आयोजित की गई। समिती के सदस्य – प्रशासक के टीम मेंबर प्रसाद धारप, चेंबर के पुर्व के अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com