– आजी, माजी मंत्र्यानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या
कन्हान :- बोरडा (गणेशी) येथे पंचकमेटी व्दारे कुस्त्या, खडा तमाशा, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमा च्या आयोजन करून मनोरंजत्माक सामाज प्रबोधन करित आमदंगल व सांस्कृतिक मंडई महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
शुक्रवार (दि.३१) जानेवारी २०२५ ला बोरडा (गणेशी) ता.पारशिवनी येथे आमदंगल व सांस्कृतिक मंडई महोत्सवात आयोजित कुस्त्याच्या आमदंगलची सुरूवात गोंडेगाव-साटक जि प सदस्य व्यकट कारेमो रे यांचे हस्ते श्री हनुमानजीच्या प्रतिमेचे पुजन करून दर्शनी कुस्ती ने करण्यात आली.
याप्रसंगी किशोर बेलसरे, उपसरपंच नरेंद्र ठाकरे, कैलाश खंडार, राजु डडुरे, गजानन गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. तदं तर खडा तमाशा कार्यक्रमास माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी भेट देत मंडई ही आपल्या ग्रामिण संस्कृतिचा अविभाज्य भाग आहे. आमदंगल हा पहेलवाना नी नियमित केलेल्या कुस्ती सराव व व्यायामाची एक परिक्षाच असते. तसेच खडा तमाशा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लेककलेच्या वारशाचा एक अनमोल ठेवा असुन अशा लोककला फक्त मनोरंजनासाठीच नसुन, त्या आपल्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतात आणि समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे या कलेचे जतन करणे आणि नवीन पिढी पर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमास राज्यमंत्री आशिष जैस्वाल हयानी भेट दिली. याप्रसंगी गावक-या नी दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार करित त्यांचे आभार मानुन आपले हे प्रेम सदैव माझ्या पाठीशी असेच काय म राहु द्या. अशा सदभावना व्यक्त केल्या. याप्रसंगी बोरडा ग्रा प सरपंचा रेखा डडुरे, उपसरपंच नरेंद्र ठाकरे, माजी पोलीस पाटील श्रीराम नादुंरकर, जेष्ट नागरिक मधुकर बंड, शिवसेना जि प सर्कल प्रमुख अनुप भुते, मंगेश बालकोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या महोत्सवाचा परिसरातील बहुसंख्येने गावकरी नागरिकांनी उपस्थित राहुन मनसोक्त आनंद लुटत लाभ घेत ला. आमदंगल व सांस्कृतिक मंडई महोत्सवाच्या यशस्वितेकरिता आयोजक पंचकमेटी दिनेश बंड, नरेंद्र ठाकरे, राजु डडूरे, संजय इंगोले, शेषराव कुहिटे, राजु राऊत गजानन कडु, परमेश्वर हारोडे, रामराव बंड, निकेश इंगोले सह समस्त गावकरी नागरिकांनी सहकार्य केले.