चंद्रपूर :-जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी महसूल विभाग येथील लिपीक विठ्ठल भाऊराव साळवे याला लाच लुचपत प्रतिबंधक कायदा नुसार सहा महीन् शिक्षा ठोठावली होती आणि दंड ३०००/- रुपये सदर केस बाबत थोडक्यात माहीती या मध्ये फिर्याद शेतकरी मोखारु गायधने यांनी फिर्याद दिली की त्यांची शेती मौजा कोरधा जि चंद्रपूर याची मोजनी करण्यासाठी आरोपी विठ्ठल साळवे यांच्या कडे गेला असता फिर्यादी याला २००० रुपयाची लाच मागितली पण सदर लाच रक्कम दयाची नसल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी विरुध्द तक्रार दिनांक २७/०९/१० ला गडचिरोली येथे दिली होती.
फिर्यादी यांच्या तक्रार वरुन आरोपी विरुध्द कलम ७ लाच लुचपत प्रतिबंधक कायदा नुसार आरोप पत्र दाखल केले. सदर खटला चंद्रपूर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात चालविला या मध्ये जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी साक्षीदार आणि रेकार्ड वरील पुरावा ग्राहय धरुन आरोपी विठ्ठल साळवे यांना ६ महीने शिक्षा आणि ३०००/ रुपये दंड केला होता.
या निकाला विरुध्द आरोपी विठ्ठल साळवे यांनी उच्च न्यायालय येथे अपील केले होते.सदर अपील दिनांक ८/१/२४ रोजी विद्यमान उच्च न्यायालय न्यायमूर्ती उर्मिला फाळके /जोशी यांच्या खंडपीठ पुढे निकाली निघाले या मध्ये विद्यमान न्यायमूर्ती यांनी मत नोंदविले की या प्रकरणात तपास अधिकारी यांनी शासना कडून सदर आरोपी विरुध्द खटला चालविण्या करीता व्यवस्थितरित्या मंजूरी घेतली नाही तसेच सरकार पक्षा तर्फे आवश्यक साक्षीदार तपासले नाही हे मुद्दे ग्राहय धरुन आरोपी विठ्ठल साळवे याला निर्दोष सोडले सदर प्रकरण ॲड.अनंत नेवारे यांनी चालविले .