तृतीयपंथी आचल वर्मा ठरली एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्र

नागपूर :- तृतीयपंथी म्हणून कुणी हिणवले तर दूर लोटले. मात्र सर्व आव्हानांवर मात करीत आज हा समुदाय आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या बळावर आपले अस्तित्व सिद्ध करून स्वत:सह समाजाचे नावलौकीक करीत आहे. याचीच प्रचिती नुकत्याच झालेल्या क्राउन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आली. मुली, महिला आणि तृतीयपंथीयांकरिता आयोजित या विशेष स्पर्धेमध्ये नागपूरकर आचल वर्मा या एमएक्स क्राउन ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या सिझनच्या विजेत्या ठरल्या.अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने आणि विधिशा बहुद्देशिय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पांडे लेआउट खामला येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये प्लॅटिनम गटात सुनीता तायडे या मिसेस क्राउन ऑफ महाराष्ट्र ठरल्या. त्यांच्या पाठोपाठ घेतलेल्या गुणांसह जयश्री चोपडे-गाडगे उपविजेत्या ठरल्या. तर अश्विनी उपाध्ये यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सिल्व्हर गटात अश्विनी दुरूगकर यांनी बाजी मारली. चंद्रपूर येथील पल्लवी माशीरकर आणि मोनिका लोहबरे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. वर्धा येथील कृष्णा बोंडे ही मिस क्राउन ऑफ महाराष्ट्रची विजेती आणि नरखेड येथील रोहिणी डखरे ही उपविजेती ठरली.चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटांच्या दोन फेऱ्या पार पडल्या. दोन्ही फेऱ्यांनंतर परीक्षकांद्वारे अंतीम विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. महिला गटात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या गटात प्लॅटिनम आणि सिल्व्हर अशा दोन भागात स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात १० आणि तृतीयपंथी गटात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, तृतीयपंथी समुदायाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धेत त्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात आल्याचे स्पर्धेच्या आयोजक अमृता सिरसाठ यांनी सांगितले.

अंकुश गेडामची एंट्री ; यश कोल्हटकरच्या गाण्यावर उपस्थितांचा ठेका

स्पर्धेच्या परीक्षक म्हणून शालिनी तभाने, रश्मी तिरपुडे, प्रविणा दाढे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेमध्ये विशेष अतिथी म्हणून अभिरूची फाउंडेशनच्या रेशमी वर्मा, गणेश बिल्ला, स्वयंदीप फाउंडेशनचे नंदकिशोर मानकर, वर्षा मानकर, ग्रीन ट्री संस्थेच्या अध्यक्षा स्वाती वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ‘झुंड’ या लोकप्रिय चित्रपटातील नायक फिल्म फेअर अवार्ड विजेता नागपूरकर अभिनेता अंकुश गेडाम यांनी उपस्थिती दर्शविली. अमृता ड्रीम स्टुडिओच्या वतीने अभिनेता अंकुश गेडाम यांना महाराष्ट्र अवार्ड देउन गौरविण्यात आले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या कमांडिग ऑफिसर प्रियंका नारनवरे आणि २०१७ चे इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध युवा गायक यश कोल्हटकर यांनाही महाराष्ट्र अवार्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात युवा गायक यश कोल्हटकर यांनी सादर केलेल्या धमाकेदार गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला होता.

स्पर्धेत सहभागी प्रेक्षकांना परिधान करण्याकरिता प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित रामटेके यांनी १०० विशेष ड्रेस डिझाईन केले. तर सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शालिनी तभाने यांनी तब्बल ६० स्पर्धकांचे वेगवेगळ्या वेषभूषेसाठी मेकअप केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आशिष नागपुरे, आकाश मशिरकर, प्रशांत गायकवाड, सुधा मशिरकर, आशिष मशिरकर यांनी विशेष सहकार्य केले.

NewsToday24x7

Next Post

भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पो पलटून एकाचा जागीच मृत्यु तर चार जख्मि..

Sun Jun 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4 :- आज रविवार मित्रांसह आनंदात घालविण्याच्या उद्देशाने कळमना येथून महिंद्रा पिकअप टेम्पोने मित्रांसह बिना संगम येथे जेवण करायला जात असता आशा हॉस्पिटल समोरील वारेगाव बाह्य वळण मार्गावर सदर पिकअप टेम्पो वाहन पलटल्यांने घडलेल्या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com