नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत ऊंटखाना, कब्रस्तानचे गेट जवळील, भिंती लगत, फिर्यादी राजेश लक्ष्मणराव खापेकर, वय ३२ वर्षे, रा. प्लॉट नं. १५६, सप्तगिरी ले-आउट, भिलगाव, यशोधरानगर, नागपूर यांनी त्यांची स्लेंडर मोटरसायकल क. एम. एच. ४९ एच ०४५१ लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून, सापळा रचुन आरोपी नामे १) लखमीकांत उर्फ आकाश संजयराव निनावे, वय २९ वर्षे, २) शशीकांत संजयराव निनावे वय २७ वर्ष दोन्ही रा. शक्तीमाता नगर, शिवनकर नगर झोपडपट्टी, नंदनवन, नागपूर ३) अंकीत कृष्णा रेहपाडे वय २४ वर्ष रा. किर्ताधर सोसायटी, वाठोडा ले-आउट, नागपूर ४) सय्यद सरफराज हुसैन सय्यद बब्बू हुसैन वय ४७ वर्ष रा. औलीया नगर, मोठा ताजबाग, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हयाव्यतीरिक्त नागपूर शहरातुन विवीध ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन होंडा स्प्लेंडर क. एम.एच ४९ एच ०४५१ २) होंडा स्प्लेंडर क. एम.एच ३१ बि.आर ५२६० ३) होंडा स्प्लेंडर क. एम. एच ३६ एम ९१२५ ४) होंडा शाईन क. एम. एच ४० ए.एल २९२४ ५) होन्डा पेंशन एम. एच ३१ बि.टी २४१६. ६) होंडा सिडी डिलक्स चे सुटे पार्ट असा एकूण किंमती अंदाजे २,००,०००/- रू चे जप्त करण्यात आलेले आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी ईमामवाडा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शखाली, गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.