नागपूर :- दिनांक २४.११.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत जुनी मंगळवारी, कुंभारे सावजी समोरील सायकल स्टैंड जवळ, रोडवर फिर्यादीचे पती नामे विजय पन्नालाल चव्हाण वय ३५ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. २, नागपूर हे त्यांचे अॅक्टीव्हा गाड़ी क. एम.एच ३१ डी.ए २०७६ ने त्याचा मित्र नामे रूपेश मुन वय ३५ वर्ष रा. जुनी मंगळवारी, नागपुर याचे सोबत असतांना आरोपी नामे विजय दिलीप डायरे वय ३० वर्ष रा. जुनी मंगळवारी, ढिवरपूरा, लकडगंज, नागपूर याने फिर्यादीचे पतीसोबत झालेल्या भांडणावरून त्याचे गळ्यावर, पोटावर चाकुने वार करून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादीस रूपेश मुन याने येवुन सांगीतले. फिर्यादी हवा त्यांचेसह घटनास्थळी व तेथुन मेयो हॉस्पीटल येथे गेल्या असता डॉक्टरांनी फिर्यादीचे पती यांना तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी नामे भारती विजय चव्हाण वय ३० वर्ष रा. जयभीम चौक, नंदनवन नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे लकडगंज येथे पोउपनि, यादव यांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ भा.दं.वि. सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.