नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हदीत राहणाऱ्या ४२ वर्षीय फिर्यादी यांची मुलगी / पिडीता वय १५ वर्ष हीचा आरोपी आयुष परमानंद बोटेले वय १९ वर्ष रा. जरीपटका, नागपूर हा पिडीत मुलगी टयुशनला व तिचे डान्स क्लासला जात असतांना नेहमी पाठलाग करतो व तिचे सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. घटनेवेळी आरोपीने फिर्यादीचे मुलीचा पाठलाग करून रस्त्यात तिचे सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून फिर्यादीचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने सबब बाब फिर्यादीस सांगीतली असता फिर्यादीचे पतीने आरोपी यास हटकले त्यावरून आरोपीने फिर्यादीचे पतीस पाहुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे जरीपटका येथे मपोउपनि काळे आरोपी विरुद्ध कलम ३५४(४), ५०६ भा.दं.वि. सहकलम १२, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेवुन आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com