नागपूर :- दिनांक ०९.०७.२००३ रोजी पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत राहणाऱ्या २८ वर्षीय फिर्यादी यांची ०५ वर्षीय अल्पवयीन मुलीस त्यांचा परिचीत आरोपी नामे शिवशंकर राकेशकुमार शर्मा वय १९ वर्ष रा. एम.आय.डी.सी. याने फिर्यादीच्या मुलीस चॉकलेट चे आमिष दाखवून घरी नेवून तिचे सोबत जबरदस्तीने लैंगीक कृत्य केले. व याबाबत कोणालाही न सांगण्याकरीता चॉकलेटचे आमिष दाखविले. पिडीत मुलीला त्रास झाल्याने डॉक्टरकडे उपचाराकरीता नेले. होते तेव्हा फिर्यादीने पिडीत मुलीला विचारपुस केली असता पिडीत मुलीने तिचेसोबत आरोपीने लैंगीक छळ केल्याचे सांगीतले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे पोउपनि चदिकर यांनी आरोपीविरुध्द कलम ३७६ (अ) (ब), भा.दं.वि. सहकलम ४, ६, ८ पोक्सो कायदाअन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेवून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.