बी.प्राक च्या गाण्यांनी होणार खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

– २८ जानेवारीला यशवंत स्टेडियमवर होणार समारंभ

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी २८ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे होणार आहे. महोत्सवाच्या समारोप समारंभात खास नागपूरकरांसाठी सुप्रसिद्ध गायक बी.प्राक यांच्या गाण्यांची मेजवानी असणार आहे.

या समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

समारोपीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय वीर सावरकर चौक ऑरेंज सिटी हॉस्पीटल समोर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, समारोपीय कार्यक्रमस्थळ यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ, जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध असून नागरिकांनी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेशिका प्राप्त कराव्यात, असे आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.

NewsToday24x7

Next Post

पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्ये आवश्यक - पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील

Thu Jan 25 , 2024
मुंबई :- पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून शासन भर देत असून पर्यटन मध्ये कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये बुधवार, 24 जानेवारी रोजी बीकेसी येथील हॉटेल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com