नागपूर :-दिनांक १७.०५.२०२३ से १८.०० ते १८.३० वा. ने सुमारास पोलीस ठाणे अजनी हदीत तुकडोजी पुतळा ते किडा चौक दरम्यान, मेडीकल चौकाकडे जाणाऱ्या टर्निंगवर, भाग्यलक्ष्मी चपल दुकाना समोरून फिर्यादीची मुलगी अश्लेषा सुनिल टेंबरे वर्ष २० वर्ष रा. चंद्रमणी नगर गल्ली न. ३ अजनी, नागपूर ही तिथे मोपेड गाडी क्र. एम. एच. ३२ ए.बी ०३४३ वर मागे डबलसिट आई वर्षा वय ४७ वर्ष हिला बसवून जात असतांना आरोपी २० चाकी ट्रक क्र. एम.एच ३६ एफ ०२५३ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोपेडला धडक दिल्याने फिर्यादीची मुलगी व पत्नी रोडवर खाली पडल्या. मुलीने डोक्याला मार लागल्याने गंभीर जख्मी होवुन बेशुद्ध झाली. तसेच पत्नीचे पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या सुध्दा गंभीर जखमी झाल्या. आरोपी घटनास्थळी वाहन सोडुन पळुन गेला, जमलेल्या लोकांनी व पोलीसांनी त्यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी फिर्यादीची मुलगी अश्लेषा हिला तपासून मृत घोषीत केले. फिर्यादीची पत्नी उपचारा करीता हॉस्पीटल मध्ये दाखल आहे.