नागपूर :- गुन्हे शाखा युनिट क्र. ०३ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत सापडा रचुन आरोपी क्र १) मोहम्मद इरफान मोहम्मद जाहीद वय २६ वर्ष, रा. आजरी माजरी, काच कंपनी जवळ, यशोधरानगर, नागपूर यांच्या घराची झडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी पिस्टल व एक राउंड किमती अंदाजे ५०,१००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीकडे या बाबत चौकशी केली असता त्याचे जवळ ही पिस्टल आरोपी क. २) आसिफ अख्तर वल्द सिराजुद्दीन अंसारी वय ३२ वर्ष, रा. नई बस्ती टेकनाका, व आरोपी क. ३) मोहम्मद आरीफ मोहम्मद मिनाज वय २७ वर्ष, रा. आजरी माजरी हस्तीनापूर, नागपूर यांचे कडुन आल्याचे सांगीतल्याने आरोपी क. २ व ३ यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांना पाहिजे असलेला आरोपी क. ४) नासीर उर्फ बच्चा शितला माता चौक, झोपडपट्टी, यशोधरानगर याचे कडुन घेतल्याचे सांगीतले. आरोपीचे हे कृत्य कलम ३२५ भा.इ.का. सहकलम १३५ म.पो.का अन्वये होत असल्याने आरोपी क. १ ते ३ यांना मुद्देमालासह पोलीस ठाणे यशोधरानगर यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), याने मार्गदर्शना खाली वपोनि महेश सागडे, सपोनी सचिन भोंडे, सफी ईश्वर खोरडे पोहवा मुकेश राऊत, अनिल जैन, प्रविण लाड, नापोज, अनुप तायवाडे, अमोल जासूद, शेख फिरोज पोअ संतोष चौधरी यांनी केली.