– आम आदमी पार्टी नागपूरचे अमित शाहा यांचे संसदेतल्या वक्तव्याच्या विरोधात आक्रोश आंदोलन
नागपुर :- आम आदमी नागपूर पार्टी ने दिनांक 19. 12. 2024 रोजी इंदोरा चौकात आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात प्रामुख्याने राज्य संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे, नागपूर संघटन मंत्री रोशन डोंगरे, नागपूर महासचिव डॉ अमेय नारनवरे, नागपूर संघटन मंत्री सचिन लोणकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आंदोलनाच्या विषय म्हणजे दोन दिवसा अगोदर संसद मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव अपमानास्पद पद्धतीने घेऊन जी अवहेलना केली या विरोधात आम आदमी पार्टीने नारे निदर्शने व धरणा दिला. या अशोभनीय व बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधातले कटकारस्थाना मुळे आंबेडकरी जनतेच्या मनाला दुखावलेल आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री यांनी जाब विचारले की उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना हे अमित शाह यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचे अपमानास्पद वक्तव्य मान्य आहे का.
या कृत्याच्या विरोध आज उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र इंदोरा चौक इथे मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहून गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध विरोध आणि माफीनामा तसेच राजीनामा द्या असे शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनी मागणी केली. याचे नारे निदर्शने करण्यात आले. यात आम आदमी पार्टीचे गिरीश तितरमारे प्रणित डोंगरे विशाल वैद्य शैलेश गजभिये संगीता बातो अलका पोपटकर अर्चना राले विपिन कुर्वे किशन निमजे हरीश वेळेकर क्लेमेंट डेव्हिड दिपक बग्गा मंजू पोपरे, सूचना गजभिये पिंकी बारापात्रे तिडके काकाजी जवादे काका जी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.