नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट

Ø नाशिक, पुणे आयटीआयमध्येही एव्हिएशन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना

Ø आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

नागपूर : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. दसॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली. फ्रान्स येथील प्रशिक्षक तसेच आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी बदलत्या काळाला अनुषंगीक असलेला हा अनोखा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरु करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

देशात हा अभ्यासक्रम नागपूर येथे सुरु आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्याकरीता फ्रान्स सरकारने यंत्रसामुग्री, प्रशिक्षक, टुल्स व कच्चा माल इत्यादी उपलब्ध करुन दिले आहेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, एव्हिएशन क्षेत्रात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम जास्तीत जास्त राबविण्याबाबत व त्यातून रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये सुरू करावेत, जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार मिळाल्यास त्यांना शहरामध्ये रोजगारासाठी येण्याची गरज भासणार नाही. त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले.

इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण

देशाबाहेर रोजगाराच्या विपुल संधी असल्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबतच फ्रेंच, जपानी व जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरू करुन विद्यार्थ्यांना परदेशातही रोजगार मिळण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध भाषातज्ञांचे ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत मदत घेता येईल, याची सुध्दा तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आयटीआयमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करुन त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांकडून भाषणे आयोजित करावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवन चरीत्रामधून प्रेरणा मिळेल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, दसॉल्ट एव्हिएशनचे समन्वयक मयुर याउल, सहसंचालक देवतळे, विशेष कार्य अधिकारी  शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

डुमरीकला शिवारात ७,१६,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी ला पारशिवनी पोलीसानी केली अटक.

Fri Dec 30 , 2022
पारशिवनी:- तालुकातिल डुमरीकला ह्दीतील डुमरीकला शिवारात निकोला बार & रेस्टॉरेंट चे समोर NH – 44 चे जवळ मंगलवार चे दिनांक २७ / डिसेबर / २०२२ रोजी टाटा योध्दा कंपनीच्या मालवाहु वाहन क्र . MH – 44 / U – 0805 चे चालक नामे भगवान वातुजी कावळे वय ४३ वर्ष रा . अंबाळा वार्ड , रामटेक हा रामटेक येथिल किराणा दुकानदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com