मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी
कन्हान :- गोंडेगाव खदान ते डुमरी अण्णा मोड रस्त्यावरील ऐसंबा ते वाघोली रोडच्या टी पाईंट वर कन्हान येथुन टयुशन करून वाघोली येथुन सायकल ने घरी परत येणा-या फिर्यादी च्या अल्पवयीन मुलीला थांबवुन दुचाकीने आलेल्या २१ वर्षीय अज्ञात इसमाने मुलीला झापड मारून विनयभंग केल्याने कन्हान पोस्टे ला आरोपी अज्ञात इसमा विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपी चा शोध घेत आहे.
मंगळवार (दि.०९) मे २०२३ चे १२ ते १२.३० वाजता दरम्यान फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १४ वर्ष ही नेहमी प्रमाणे ती कन्हान येथुन टयुशन करून बस ने वाघोलीला येऊन तेथुन तिच्या सायकलने घरी परत येत असताना गोडेगाव खदान ते डुमरी अण्णा मोड रोडवरील येसंबा ते वाघोली रोडच्या टि पाईट जवळ समोरुन येसंबा गावाकडुन येणाऱ्या रोडने एक अज्ञात इसम वय अंदाजे २१ वर्ष त्याच्या अंगावर पिवळया रंगाची फुल बाहयाचा टि शर्ट व काळया रंगाचा फॉर्मल पॅन्ट घातलेला तसेच डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेला असुन तोंडावर मास्क लावलेला इसम हा त्याच्या लाल काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीने फिर्यादीच्या मुलीच्या जवळ येवुन तिची सायकल थांबवुन त्याने त्याची गाडी थांबविली आणि मुलीच्या खांदयावर हात टाकुन तिला खाली दाबले व उभे केले आणि मुलीच्या गालावर थापड मारली. व अज्ञात इसमाने त्याच्या तोंडावरुन मास्क काढुन फिर्यादीच्या मुलीची मान पकडुन म्हणाला की ” मुझे किस दो ” असे म्हटले असता मुली ने आरडा ओरडा केला असता तेथील आजुबाजुच्या शेतातील लोक धावुन आले असता लोकांना त्याच्याकडे येतांना पाहुन अज्ञात इसम त्याच्या वाहना ने तेथुन पळुन गेला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारी वरुन पो.स्टे.कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३५४, ३५४ अ, ३२३ भादंवि सहकलम १२ बालकांचे लैगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास महिला पोउपनि सिमा बेंदरे पोस्टे कन्हान या करीत आहे.
@ फाईल फोटो