कोदामेंढी जि. प. शाळेतील विद्यार्थी यांची NEET व JEE करीता निवड

– WCL CSR डिपार्टमेंट चा प्रोजेक्ट TARASH(एजुकेशन )अंतर्गत उपक्रम

कोदामेंढी :- येथील जि. प. हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयतील 10 व्या वर्गातील दोन विद्यार्थीनी ताजेश्री आनंद बावनकुले व जानवी शंकर सपाटे यांची NEET करीता तर एक विद्यार्थी पियूष रविंद्र पटले या विद्यार्थियाची JEE करीता निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,WCL CSR डिपार्टमेंट कडून प्रोजेक्ट TARASH(एजुकेशन ) अंतर्गत 23 एप्रिल 2023 ला जिल्ह्यातील 12 जि. प. शाळेतील एकूण 113 विद्यार्थी यांची असेसमेंट टेस्ट नागपुर येथील काटोल रोड (सदर)स्थित जि. प. शाळेत घेण्यात आली. त्यापैकी 52 JEE,38 NEET परिक्षेत असे एकूण 90 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मेरिट लिस्ट नुसार WCL ने JEE करिता 5, NEET करिता 5 असे एकूण 10 विद्यार्थी यांची निवड़ केली.10 पैकी 3 विद्यार्थी जि. प. हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोदामेंढी येथील असून, इतर 7 विद्यार्थी भिवापुर, काटोल रोड (सदर ),नीलड़ोह, पाचगांव, रामटेक या जि. प. शाळेतील आहे. या जिल्ह्यातील 6 जि. प शाळेतील मुख्याध्यापक,10 विद्यार्थी व त्यांचे पालक़ यांची सभा पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागपुर येथील आकाश बॉयजूस कोचिंग क्लासेस येथे 6 मे ला घेण्यात आली. या निवड झालेल्या 10 विद्यार्थी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोंडेगाव खदान येथील कोळसा चोरी करुन नेणाऱ्या आरोपीस व्हँनसह पकडले

Thu May 11 , 2023
मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी – वेकोलि सुरक्षा रक्षकांची कारवाईत कोळसा, ओमनी कार सह ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील धन्यवाद गेट जवळ कांद्री येथे गोंडेगाव खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करुन ओमनी कारमध्ये भरुन नेतांना वेकोलि कामठी खुली खदान सुरक्षा कर्मचा-यानी पाठलाग करून आरोपीस पकडुन त्यांचे जवळुन १३०० किलो कोळसा व ओमनी कार असा एकुण ४०,४०० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com