‘जागतिक मानवी हक्क दिन’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान-किमान कार्यक्रम माहे डिसेंबर-2024 नुसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली व महिला महाविद्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मानवी हक्क दिनाबाबत’ कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 11 डिसेंबर, 2024 रोजी महिला महाविद्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ पाटील, कार्यक्रमाल विशेष अतिथी म्हणून वसंत भा कुलकर्णी, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून आर आर पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ दुपारे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आर आर पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी मानवी हक्क अधिकाराची पार्श्वभूमी आणि मानवी अधिकार या विषयी विस्तृत असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थीनींना केले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले वसंत भा कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी मानवाला जन्मजात जे अधिकार प्राप्त झाले आहेत ते मानवी अधिकार होत पण अतिशय महत्वकांक्षी व विवेक बुद्धी असलेला माणूस कधी कधी दुसऱ्यांच्या मानवी हक्कांची कशी पायमल्ली करतो यातील गुंतागुंती बाबतचे अनेक दृष्टांत देऊन विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले.

कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ गजबे यांनी केले तर आभार डॉ जोत्सना राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करणेकरीता महिला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली चे एन. आर. भलमे, वरिष्ठ लिपीक, जे एम. भोयर, कनिष्ठ लिपीक, एस एस नंदावार यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मग्रारोहयोंतर्गत सद्या कोणतीही पदभरती नाही

Thu Dec 12 , 2024
यवतमाळ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची जाहिरात समाजमाध्यमातून पसरविण्यात येत आहे. परंतू अशी कोणत्याही प्रकारची पदभरती सद्या केली जात नसून समाजमाध्यमावर दिशाभूल केली जात आहे. मग्रारोहयोंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व क्लर्क कम डेस्क ऑफीसर या विविध कंत्राटी पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत असल्याबाबतची जाहिरात विविध समाजमाध्यमातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!