प्लॉग रनच्या माध्यमातून नागपूरकरांनी केला स्वच्छतेचा जागर

– अतिरिक्त आयुक्तांनी केली स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा

– हजारो नागरिकांनी केला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहर होण्याचा निर्धार

नागपूर :- नागपूर शहर हे देशातील इतर शहरांपेक्षा स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी रविवारी सकाळी (१७ सप्टेंबर) स्वच्छतेचा जागर केला. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहर करीत कचरामुक्त करण्याचा निर्धार केला. केंद्र शासनाच्या ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ या स्पर्धेचे सहभाग घेत नागपूर महानगरपालिकेच्या ‘नागपूर टायगर्स’ संघाने स्वच्छता ‘प्लॉग रन व रॅली” चे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमादम्यान मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मनपाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली.

कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या वतीने राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) ते चिटणीस पार्क यादरम्यान “प्लॉग रन व रॅली” चे आयोजन करण्यात आले. एक पाऊल स्वच्छतेकडे टाकत हजारो नागरिकांनी ‘प्लॉग रन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, सहायक आयुक्त गणेश राठोड, नागपूर टायगर्स संघाची कर्णधार सुरभी जयस्वाल, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गुरदास राउत.

गच्चीवरील माती विरहित बाग समूहचे उमेश चित्रीव, नागपूर @2025चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे, समन्वयक निमेश सुतारिया, शिवकुमार राव, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सेल्फ लोकल बॉडीचे संचालक जयंत पाठक, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्टच्या नेहा ठाकूर यांच्यासह मनपा शाळेतील विद्यार्थी तेजस्विनी महिला मंच, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, नागपूर प्लॉगर्स,रामदेवबाबा इंजिनिरिंग कॉलेजचे आरइइएफ चमू,रोटरी ईशान्य या संस्थेचे स्वयंसेवक, मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.

चिटणीस पार्क येथील समारोपीय कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल म्हणाल्या की, नागपूर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. तरी स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा देशातून 27 वा तर राज्यातून आठवा क्रमांक लागतो. लाखोंची लोकसंख्या असणाऱ्या नागपूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी 10 हजार स्वच्छता दूतांवर आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यातूनच शहर स्वच्छ सुंदर आणि स्वस्त साकारण्यास मदत मिळेल. स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतःपासून करायला हवी घरातील कचरा वेगवेगळ्या करून स्वच्छता दूताकडे द्यावा. नागरिकांनी या स्वयंशिस्तीचे पालन केल्यास नागपूर शहराला महाराष्ट्रातून नंबर एक चे स्वच्छ शहर आणि देशातील टॉप टेन शहरांच्या यादीत आणण्यास नक्की यश मिळेल असा विश्वासही श्रीमती गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन स्वच्छते विषयी माहिती दिली. अधिकाऱ्याला आपल्यामध्ये पाहून विद्यार्थीही आनंदी झाले.

राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) पासून “प्लॉग रन व रॅली” ची सुरूवात झाली. अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि नागपूर टायगर संघाची कर्णधार सुरभी जयस्वाल यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. तत्पूर्वी टाऊन हॉल येथे नागरिकांच्या सोयीकरिता ई- कचरा संकलन केंद्र, वृत्तपत्र संकलन केंद्र, प्लास्टिक वेस्ट संकलन केंद्र, जुने कपडे संकलन केंद्र, जुने पुस्तक संकलन केंद्र(E-Waste, Plastic Waste, News Paper) तयार करण्यात आले होते. याशिवाय सेल्फी स्टॅन्ड सिंगल युज प्लास्टिक संदर्भात जनजागृती करणारे फलक पर्यावरणपूरक गणेशउत्सवा संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते. रॅली दरम्यान सर्वांनी जनजागृती पर फलक हाती घेतले होते. टाऊन हॉल जवळ रॅली पोहोचताच एम ए के आझाद उर्दू माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तर बडकस चौक येथे लाल बहादूर शास्त्री माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने या गाण्याच्या संगीतावर लागण च्या मार्गावरील कचरा उचलून मार्ग स्वच्छ करण्यात आला.

– स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे विजेते

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा कार्यक्रमादरम्यान करण्यात आली. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. 469 मोहल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्यातील 20 विजेत्या मोहल्लांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली यात अनुक्रमे प्रथम क्रमांक धरमपेठ झोन अंतर्गत येणारे अभ्यंकर नगर आणि माधव नगर परिसर, द्वितीय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणारे सुर्वेनगर व तृतीय गणेश नगर SD हॉस्पिटल, आझाद पार्क जवळ या मोहल्यांचा समावेश आहे. तर नेहरूनगर झोन- भोसले नगर, छोटा ताजबाग मागे, सक्करदरा. धरमपेठ झोन- धरमपेठ वेस्ट व भगवाघर, सतरंजीपुरा झोन- मेहंदीबाग, गांधीबाग झोन- रतन कॉलनी, महाल, धरमपेठ झोन- पायनियर श्रेयस अर्पाटमेंट,

आशीनगर झोन- दीक्षित नगर नारी रोड, धरमपेठ झोन- धंतोली, दीनानाथ विद्यालय जवळ , गांधीबाग झोन- राणी इंदिराबाई विहार, तुळशीबाग मार्ग, महाल, लकडगंज झोन- एच. बी. टाऊन कॉलोनी, प्रजापती मेट्रो रेल्वे स्टेशन समोर, धरमपेठ झोन- हिंदुस्तान कॉलनी, अमरावती रोड, लकडगंज झोन – प्रजापती नगर भास्कर व्यास मैदान, नेहरूनगर झोन- गुरुदेव नगर, नंदनवन, अशीनगर झोन – वैशाली नगर, एन. आय.टी चौक, लकडगंज झोन – नेताजी नगर, पारडी. हनुमाननगर झोन- चंडिका नगर, ओंकार नगर. नेहरूनगर झोन- दत्तात्रय नगर, हनुमाननगर झोन- राहाटे नगर टोली, शताब्दी नगर ले-आऊट, या मोहल्यांचा सहभाग आहे. विजेत्या प्रथम तीन मोहल्लांमध्ये मनपाच्या वतीने प्रत्येकी रुपये 25 लाखचे विकास कामे केली जाणार असून, इतर विजेत्या मोहल्यांमध्येही विविध विकास कामे केली जाणार आहेत. स्पर्धेकरिता नागपूर@2025 संस्थेचे सहकार्य लाभले होते.

– बासुरीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने वातावरण झाले प्रसन्न

चिटणीस पार्क येथे झालेल्या समारोप या कार्यक्रमात ‘बासुरीवाला’ या संगीत समूहाने अप्रतिम वादन व गायन प्रस्तुत करून या कार्यक्रमात रंगात आणली. बासरीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने वातावरण प्रसन्न झाले. उपस्थित असलेले मनपाचे सर्व स्वछता दूत, मनपा शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, मनपा कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी प्रस्तुतीचा आनंदा लुटला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील विविध गाण्यांवर ठेका धरला. मनपा शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी गाणे सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परांजपे यांनी तर आभार नागपूर टायगर्स संघाची कर्णधार सुरभी जयस्वाल यांनी मानले केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

औषध निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी - केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी

Mon Sep 18 , 2023
– निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन नागपूर :- औषध निर्मितीचे क्षेत्र व्यापक असून भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तारच होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला. बुटीबोरी येथील निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समीर मेघे, माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com