– एकानंतर एक चोऱ्या
– दोन बस मधून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी
काटोल :- काटोल बस स्थानकावर अज्ञात चोरट्याने एका महिलेचे बागेतून दीड लाखाच्या जवळपास सोनेचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवार ला दीड च्या सुमारास घडली. तर बस स्थानकावर दुपारी साडेतीनच्या सुमारास दुसऱ्या बस मधील एका महिलेच्या गळातील साडेतीन तोळ्यांची पोत अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची दुसरी घटना घडली.
भंडारा जिल्ह्यातील मोहदा मारोडी येथील सासू आणि सून हे नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे भाऊबीज करिता आले होते. जलालखेडा येथून निंबाळकर सासू आणि सुन हे नागपूर जाण्याकरिता बस मध्ये बसल्यात. बस खराब झाल्याने काटोल येथून दुसरी बस बद्दलविण्यात आली. त्यामुळे काटोल येथील बस स्थानकावरून नागपूर-वरुड-नागपूर बस क्र. एम एच 40, वाय 5232 मध्ये दोघीही चढल्या. सीटवर बसते वेळी पर्सची चैन उघडी असल्याचे सुनेच्या लक्षात आले. पर्स मध्ये असलेली लहान पर्स दिसली नसल्याने सोन्याची पोत आणि डोरल असे दीड तोळ्यांचे दागिने लंपास झाल्याने महिलांची आरडा ओरड सुरू केली व बस पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. पोलिसांनी बस मधील पूर्ण प्रवासी यांची तपासणी केली पण दागिने सापडून आले नाही. सासू आणि सुनेने दागिने चोरीला गेल्यामुळे रडून रडून त्यांच्या अंगाचा धरकाप होत राहिला. तर सासू निंबाळकर यांना दवाखण्यात नेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सर्व प्रवासी यांची तपासणी काटोल पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली पण सोन्याचे दागिने मिळून आले नाही. विशेष म्हणजे महिलेचे पती हे आर्मी मध्ये लडदाख मध्ये तैनात असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.
तर दुसऱ्या घटनेत ठाकरे सासू आणि सून या काटोल येथे लग्नाला आल्या होत्या. काटोल येथून आष्टी ला जाण्याकरिता काटोल-कारंजा-मूर्ती बस क्र. एम एच 40/ए कु 6419 ने कारंजा पर्यंत जाण्याकरिता बस मध्ये चढत असताना सासू च्या गळातील पोत साडेतीन तोळ्यांची कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरल्याचे लक्षात येताच गाडी पोलीस स्टेशन काटोल येथे आणण्यात आली. सर्व प्रवासी यांची तपासणी केली असता पोत मिळून आली नाही. फिर्यादी यांनी काटोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दिली आहे.
बसस्थानकातील पोलीस चौकी नावापुरती
काटोल बसस्थानकामधील पोलीस चौकी असून पोलीस चौकी करिता आवारातील एक रूम देण्यात आली. पण तिथे कोणताच पोलीस कर्मी नसल्याने पोलीस चौकीला नेहमीच लॉक लागले असते.
*बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेराचा अभाव*
काटोल बस स्थानक हे अमरावती आणि नागपूर च्या मध्यंतरी काटोल हे मोठे बस स्थानक पडते. या बस स्थानकावर कॅमेराचा अभाव असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असते. बस स्थानकावर कॅमेरा लावण्याबाबत बसस्थानकाचे डेपो व्यवस्थापक यांना अगोदरच पत्र दिल्याचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी सांगितले. बस स्थानकावर वारंवार चोऱ्या होत असूनसुद्धा एसटी महामंडळ काटोल बस स्थानकावर सीसीटीव्ही लावत नाही. बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे असे सर्व सामान्य प्रवासी सुद्धा आता म्हणायला लागले आहे.