संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या एक्स हँडल वरून मोदी सरकारने शेतात वापरल्या जाणाऱ्या खतांची किंमत वाढवून शेतकऱ्यांना त्रास देत आहे आणि सरकारच्या अशा धोरणामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे असा संदेश दिला. वास्तविकता यासंदर्भात देशमुख यांच्याकडे असा कुठलाही पुरावा नसताना सरकार पिकाला चांगला भाव न देता खताचे भाव वाढविले अशी खोटी माहिती पसरवली.वास्तविकता आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अश्या प्रकारचे खोटे संदेश दिल्याने सर्वसामान्य जनतेसह कष्टकरी बळीराजा खचून जाईल ज्यामुळे गैरसोय निर्माण होत सरकार बद्दल नाहक राग निर्माण होईल तेव्हा सर्वसामान्य जनतेसह शेतकरी वर्गात सरकारविषयी राग निर्माण करण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून आचार संहिता लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलमाचे उल्लंघन केल्याने भारतीय दंड संविधानाच्या अंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 -अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजप चे नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान यांच्या नेतृत्वात आज नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे भाजप च्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांना सामूहिक तक्रार देण्यात आली.
याप्रसंगी भाजप कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, लाला खंडेलवाल, गादा ग्रा प सरपंच सचिन डांगे, खैरी ग्रा प चे माजी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे,ग्रा प सदस्य योगेश डाफ, ग्रा प उपसरपंच महेश कावडे,माजी नगरसेवक कपिल गायधने,तुकाराम जिभकाटे,सरपंच संजय जीवतोडे,सरपंच लक्ष्मण करारे,मंगेश शाहू, सरपंच ऋषी भेंडे,सुनील डाफ,शानु ग्रावकर,यश कोंडे,रजत यादव आदी उपस्थित होते.