संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागिल काही महिन्यात कामठी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गोवंश जनावरे,बकऱ्या चोरी यासारख्याही घटना वाढलेल्या आहेत.नुकतेच अतिष यादव यांच्या गाईच्या गोठ्यातून पाच गोवंश जनावरे चोरीस गेल्याची घटना घडली असून इतक्यात 30 च्या जवळपास जनावरे चोरीस गेल्या आहेत.उल्लेखनीय आहे की गादा,आजनी गावातून सुदधा बकऱ्या चोरीस गेल्या आहेत तसेच रामगढ परिसरात ट्रक मधून ऑइल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याना अटक करण्यात आले होते.या सर्व चोरी प्रकरणात आंतरराज्यीय टोळीसह काही चोरटे स्थानिक आहेत.तेव्हा पोलिसांनी या चोरीच्या घटनेला गांभीर्याने घेत वाढत्या चोरीवर अंकुश साधावा या मागणीसाठी अखिल भारतीय अहीर महासभा व कामठी दुग्ध संगठन च्या शिष्टमंडळ द्वारा नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने कामठी व नागपुर यादव समाज चे अतीस यादव,मंगेश यादव,नितेश यादव,रोशन यादव,स्वयंम यादव, करण यादव,प्रमेन्द्र यादव,बजरंग जैसवाल नागपुर चे ओमप्रकाश यादव,गोविंद यादव,राजेश चौधरी,राजेश ठाकुर आदी उपस्थित होते.