वाढत्या चोऱ्यांच्या घटनेवर आळा घालण्यासंदर्भात पोलीस निरीक्षकांना सामूहिक निवेदन सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागिल काही महिन्यात कामठी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गोवंश जनावरे,बकऱ्या चोरी यासारख्याही घटना वाढलेल्या आहेत.नुकतेच अतिष यादव यांच्या गाईच्या गोठ्यातून पाच गोवंश जनावरे चोरीस गेल्याची घटना घडली असून इतक्यात 30 च्या जवळपास जनावरे चोरीस गेल्या आहेत.उल्लेखनीय आहे की गादा,आजनी गावातून सुदधा बकऱ्या चोरीस गेल्या आहेत तसेच रामगढ परिसरात ट्रक मधून ऑइल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याना अटक करण्यात आले होते.या सर्व चोरी प्रकरणात आंतरराज्यीय टोळीसह काही चोरटे स्थानिक आहेत.तेव्हा पोलिसांनी या चोरीच्या घटनेला गांभीर्याने घेत वाढत्या चोरीवर अंकुश साधावा या मागणीसाठी अखिल भारतीय अहीर महासभा व कामठी दुग्ध संगठन च्या शिष्टमंडळ द्वारा नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने कामठी व नागपुर यादव समाज चे अतीस यादव,मंगेश यादव,नितेश यादव,रोशन यादव,स्वयंम यादव, करण यादव,प्रमेन्द्र यादव,बजरंग जैसवाल नागपुर चे ओमप्रकाश यादव,गोविंद यादव,राजेश चौधरी,राजेश ठाकुर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका! - चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका

Fri Apr 5 , 2024
· राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. · संजय धोत्रे यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्याचा निषेध · चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका मुंबई :- अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com