येरखेडा ग्रा प ची अंतिम ‘प्रभागरचना जाहीर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी तालुक्यातील 27 ग्रा प चे अंतिम प्रभाग रचना जाहीर
कामठी ता प्र 27:-कामठी तालुक्यातील एकूण 47 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायत चा पंचवार्षिक कार्यकाळ यावर्षीच्या शेवटी संपण्याच्या मार्गावर असल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निहाय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला असून या 27 ही ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचना प्रारूप ‘अ’ आज 27 मे ला जाहीर करण्यात आले असून हे अंतिम प्रभाग रचना नमुना ‘अ’कामठी तहसील कार्यालय , पंचायत समिती कामठी, मंडळ अधिकारी ,तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत च्या सूचना फलकावर जनतेच्या माहिती करिता प्रसिद्ध करण्यात आले असून ज्या ग्रामपंचायती मध्ये आक्षेप प्राप्त झाले होते अश्या येरखेडा,रणाळा, भोवरी व वडोदा या चार ग्रामपंचायत मध्ये सुद्धा परिशिष्ट 15 आक्षेप कर्ता व जनतेच्या माहिती करिता सदर ग्रा प च्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम तसेच निवडणूक विभागाचे चंद्रिकापुरे यांनी दिली.
कामठी तालुक्यात एकूण 47 ग्रामपमचायती आहेत यापैकी मुदत संपलेल्या 20 ग्रामपंचायती ची निवडणूक यापूर्वी झाली असून उर्वरित 27 ग्रा प ची मुदत संपण्याच्या मार्गावर असून आगामी काळात होऊ घातलेल्या या 27 ग्रा प ची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून प्रसिद्ध झालेल्या या अंतिम प्रभाग रचना ग्रामपंचायतीत येरखेडा,रणाळा, बिना, भिलगाव,खैरी, खसाळा, सुरादेवी, खापा,कढोली, भोवरी, आजनी,लिहिगाव, कापसी(बु),गादा,सोनेगाव,गुमथी, आवंढी,गुमथळा, तरोडी बु,परसाड,जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवणी, भुगाव, वडोदा चा समावेश आहे.या 27 ही ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या 70 हजार 654 असून यामध्ये 12 हजार 537 अनु जाती तर 2979 अनु जमाती ची लोकसंख्या आहे तर या 27 ग्रा प मध्ये 93प्रभाग राहणार असून एकूण 247 सदस्य निवडून येणार आहेत यामध्ये अनु जाती चे 42, अनु जमाती चे 7 , नामाप्र चे 43 व सर्वसाधारण प्रवर्गातील 155 सदस्यांचा समावेश राहील.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!