गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूचना

गडचिरोली :- याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील शेतकऱ्यांकडून धान खरेदीकरीता महाराष्ट्र शासनाने खरेदीचा कालावधी दिनांक 01.05.2023 ते 30.06.2023 निश्चित केलेला आहे. मागील हंगामापेक्षा शेतकरी नोंदणी कमी झालेली असल्याने शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहु नयेत याकरीता दिनांक 31.05.2023 पर्यंत NeML पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांनी दिनांक 31.05.2023 सायंकाळ 5.00 वाजेपर्यंत ई-पिक पेरा नोंदणी तसेच गाव नमुना 7/12 चालु हंगामाचा पिक पेरा असलेला ऑन-लाईन उताऱ्याची मुळ प्रतिसह गाव जोडलेल्या केंद्रावर नोंदणी करणेस आपणास आवाहन करण्यात येत आहे.

हंगाम 2022-23 (रब्बी) मधील भरडधान्य खरेदीचा व शेतकरी नोंदणीचा कालावधी दिनांक 04.05.2023 ते 20.05.2023 असा निश्चित केलेला आहे. प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत मंजुर भरडधान्य मका खरेदी केंद्र पुढीलप्रमाणे आहे. तालुका- कुरखेडा, उप प्रा.का.चे नाव- कुरखेडा, मंजुर मका खरेदी केंद्र TDC कुरखेडा., तालुका-धानोरा, उप प्रा.का.चे नाव- धानोरा, मंजुर मका खरेदी केंद्र TDC धानोरा., तालुका-चामोर्शी, उप प्रा.का.चे नाव – घोट, मंजुर मका खरेदी केंद्र TDC मार्कंडा.

तरी नोंदणीपासून वचित शेतकऱ्यांनी दिनांक 20.05.2023 सायंकाळ 5.00 वाजेपर्यंत ई-पिक पेरा नोंदणी तसेच गाव नमुना 7/12 चालु हंगामाचा पिक पेरा असलेला ऑन-लाईन उताऱ्याची मुळ प्रतिसह उपरोक्त नजिकच्या भरडधान्य केंद्रावर नोंदणी करणेस आपणास आवाहन करण्यात येत आहे. असे प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांनी कळविले आहे.

NewsToday24x7

Next Post

तालुकास्तरावर होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

Thu May 18 , 2023
गडचिरोली :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com