सावनेर :- दिनांक २६/०५/२०२३ चे ०९/०० वा. दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ राहणारा आरोपी नामे धर्मेंद्र पुंडलीक बनकर, रा. तेलकामठी कळमेश्वर याने फिर्यादीस एका वर्षा अगोदर मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलला असता फिर्यादीने याबाबत आपल्या आई वडीलांना सांगीतल्यावरून आरोपीने त्यांना माफी मागीतली होती. फिर्यादीचा एम. एस. सी. आय. टी. चा क्लास असल्याने फिर्यादी नियमीत वेलेवर आपले आतेभाऊच्या गाडीवर वसुन सावनेर येथे येत असता नमुद आरोपी सुद्धा तिच्या मागे येवून फिर्यादीचे क्लास सुटल्यानंतर फिर्यादी बस स्टॉप येथे बसची वाट पाहत असता आरोपी हा फिर्यादी जवळ येवून म्हणाला की तु बारावीचा निकाल का सांगीतला नाही यावरून तु विचारणार कोण? असे फिर्यादीने म्हटले असता फिर्यादीचे हातातील मिठाईचा डब्बा घेतला व गाडीवर बसण्यास बोलला फिर्यादीने बसण्यास नकार दिला अशाप्रकारे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून फिर्यादीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने वेळोवेळी या पद्धतीने पाठलाग केला. सदर प्रकरणी फिर्यादी या रिपोर्टवर पोस्टे सावनेर येथे आरोपी विरूद्ध ३५४ ड भादवी सहकलम १२ पोक्सो कायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास मसपोनी मोकासे या करीत आहे.
विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com